‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची गर्दी; किंग खान याने का मागितली माफी ?

'पठाण' सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख खान याने का मागतली माफी? अभिनेता म्हणाला, 'सॉरी पण मला अपेक्षा होती....', किंग खानच्या एका पोस्टची सर्वत्र चर्चा

'मन्नत' बाहेर चाहत्यांची गर्दी; किंग खान याने का मागितली माफी ?
शाहरुख खान याची क्रेझ अखेर झाली कमी ? १२ दिवसांनंतर 'पठाण' सिनेमाच्या कमाईत मोठी घट
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 8:18 AM

मुंबई : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन स्टारर ‘पठाण’ (pathan) सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहे. चार वर्षांनंतर अभिनेता शाहरुख खान याची रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार असल्यामुळे चाहत्यांच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. सिनेमा दोन दिवसांनंतर प्रदर्शित होणार असल्यामुळे किंग खान याच्यासह चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र पठाण सिनेमाची चर्चा सुरु असताना किंग खान यांने ट्राफिक नियंत्रणात आणणाऱ्यांची माफी मागितली आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शाहरुखने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख मन्नतच्या बालकनीमध्ये उभा आहे. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी जमलेली दिसत आहे. चाहते मोठ्या उत्साहात शाहरुख खान म्हणून ओरडताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र किंग खानच्या व्हिडीओची चर्चा आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखने खास व्हिडीओ पोस्ट करत ट्राफिक नियंत्रणात आणणाऱ्यांची माफी मागितली आहे. ‘प्रेमळ रविवारसाठी धन्यवाद… सॉरी पण मला अपेक्षा आहे की, लाल गाडीवाल्यांनी सीट बेल्ट लावले होते. असं किंग खान कॅप्शनमध्ये म्हणाला आहे. शिवाय अभिनेत्याने चाहत्यांना पठाण पाहण्यासाठी आवाहन देखील केलं आहे. ‘पठाणसाठी तिकीट बूक करा, मी तुम्हाला तिथे बघेल..’ सध्या अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

महत्त्वाचं म्हणजे सिनेमाची ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहेत. ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशीच सिनेमाने मोठा गल्ला जमा केला आहे. मीडिया रिपोर्टने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४० कोटी रुपयांची कमाई करु शकतो. तर शनिवार आणि रविवारी सिनेमा भारतात तब्बल १५० ते २०० कोटी रुपयांपर्यंत गल्ला गोळा करु शकतो.

पठाणमुळे वाद निर्माण झाल्याने याचा फायदा हा चित्रपटालाच होताना दिसत आहे. प्रदर्शनापूर्वी मोठ्या संख्येने तिकिटांची विक्री झाल्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मीडियारिपोर्ट्स नुसार, ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यावर होणारा विरोध पाहता सेंसर बोर्डाने सिनेमातील काही सिनवर कात्री चालवली असून सिनेमात महत्त्वाचे बदल केले आहेत. सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.