Jawan : सलमान खान याने किंग खानसाठी उचललं मोठं पाऊल ! शाहरुख याच्या ट्विटवर बसणार नाही विश्वास
Salman Khan | शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील नात्याचं सत्य पुन्हा एकदा आलं सर्वांसमोर... किंग खान याचं ट्विट पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल... सध्या सर्वत्र शाहरुख - सलमान यांच्या नात्याची चर्चा...
मुंबई | 2 7 ऑगस्ट 2023 : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खान यांच्या मैत्रीबद्दल अनेक गोष्टी समोर येत आसतात. एवढंच नाही तर, दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील शाहरुख खान याने एक ट्विट करत सलमान खान याच्यासोबत असलेल्या मैत्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख आणि सलमान यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्याने आस्क एसआरके सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी किंग खान याने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली.
शाहरुख खानचा आगामी सिनेमा ‘जवान’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या ‘नॉट रमैया वस्तावैया’ या लेटेस्ट गाण्याचा टीझर शनिवारी प्रदर्शित करण्यात आला. यानिमित्ताने शाहरुखने त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आस्क एसआरके सेशनच्या माध्यमातून संवाद साधला. सध्या सर्वत्र किंग खान याची चर्चा रंगत आहे.
यादरम्यान एका चाहत्याने सलमान खान याच्या नव्या लूकचं कनेक्शन ‘जवान’ सिनेमाशी जोडलं आहे. ज्यावर शाहरुख खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला होता. सलमानचा नवा लूक पाहिल्यानंतर एक चाहत्यांने किंग खान याला विचारलं, ‘सलमान खान याचा लेटेस्ट लूक सांगत आहे की, अभिनेता जवान सिनेमाचं प्रमोशन करत आहे..’
चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत किंग खान म्हणाला, ‘सलमान भाई याला माझ्यावर असलेलं प्रेम दाखवण्यासाठी लूक बदलण्याची गरज नाही…त्याने कायम माझ्यावर मनापासून प्रेम केलं आहे… बस्स… सांगितलं म्हणजे सांगितलं…’ सध्या अभिनेत्याचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे… सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंग खान ‘जवान’ सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहे.
‘टायगर ३’ सिनेमात दिसणार शाहरुख – सलमान
२०२३ च्या सुरुवातीला किंग खान याचा ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमात सलमान खान याने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता दोघांची जोडी ‘टायगर ३’ सिनेमात देखील दिसणार आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या ‘टायगर 3’मध्ये तुम्हाला ‘पठाण’ म्हणजेच शाहरुख खानचा कॅमिओ पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वत्र टायगर आणि पठाण यांची चर्चा रंगली आहे.