पत्नी गौरी खान हिच्यासोबत सतत भांडत असतो शाहरुख खान ; अखेर दोघांमधील वाद समोर आलेच
परफेक्ट कपल म्हणून ओळख असलेल्या गौरी - शाहरुख यांच्यामधील वाद अखेर समोर आलेच... व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ
मुंबई : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याची स्टाईल, अभिनय, खास अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. सध्या शाहरुख ‘पठाण’ सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगलेली असताना अभिनेत्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता देखील अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खान पत्नी गौरी खान (gauri khan) हिच्यासोबत भांडताना दिसत आहे. एका मुद्द्यावरुन दोघांचा वाद सुरु असल्याचं दिसत आहे. शिवाय शाहरुख आणि गौरी यांचा वाद सुरु असताना दिग्दर्शक करण जोहर थट्टा करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख त्याच्या स्लीप पॅटर्नबद्दल बोलताना दिसत आहे. किंग खान याचा मित्र करण जोहर देखील त्याठिकाणी उपस्थित आहे. पण करण, गौरी आणि शाहरुख यांच्यामधील वाद मिटवण्याचा नाही तर, वाढवण्याचं काम करताना दिसत आहे. सध्या शाहरुख याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ( gauri khan real name)
व्हिडीओमध्ये फोनवर शाहरुख बोलताना दिसत आहे. ‘यार गौरी तू सोडना… मला इतक्या वर्षांपासून ओळखत आहेस, तरी देखील माझ्या स्लीप पॅटर्नवर वाद घालत आहेस. तू आराम कर… मी ४४ वर्षांचा आहे. या गोष्टी कशा हँडल करायाच्या मला माहिती आहेत….’ सध्या व्हिडीओ तुफान व्हायकल होत आहे. शाहरुख याच्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
शाहरुख आणि गौरी यांची लव्हस्टोरी आज प्रत्येकाला माहिती आहे. शाहरुख याने ज्या मुलीसोबत प्रेम केलं, त्याचं मुलीसोबत लग्न केलं. आज शाहरुख त्याच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. शाहरुख आणि गौरी यांनी तीन मुलं आहेत. आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान… शाहरुख खान याची लेक सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (shahrukh khan family)
शाहरुख खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने तब्बल चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केलं आहे. म्हणून किंग खान याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केली. सध्या शाहरुख स्टारर पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम करत आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या आठवड्यात सिनेमा किती रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.