मुंबई : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) सध्या ‘पठाण’ (paathan) सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. बुधवारी सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या सिनेमाने फक्त तीन दिवसात जवळपास १६० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. चार वर्षांनंतर ‘पठाण’ सिनेमातून अभिनेता शाहरुख खान याची मोठ्या पडद्यावर झालेली दमदार एन्ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. पठाण सिनेमाला मिळालेल्या यशानंतर किंग खानच्या पुढच्या सिनेमाची चर्चा रंगू लागली आहे. ‘झीरो’ सिनेमानंतर चाहत्यांना शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमासाठी ४ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. पण अभिनेत्याच्या पुढच्या सिनेमासाठी प्रेक्षकांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. (shahrukh khan movies)
‘पठाण’ सिनेमानंतर अभिनेता ‘जवान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी ‘जवान’ सिनेमा गिफ्ट असणार आहे. कारण सिनेमासाठी किंग खान याने मेहनत करायला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी पासून शाहरुख ‘जवान’ सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.
सिनेमाच्या शुटिंगचं शेड्यूल ६ दिवसांचं असणार आहे. यादरम्यान अभिनेता जवान सिनेमातील ऍक्शन सीन शूट करणार आहे. जवान सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत सान्या मल्होत्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जवान सिनेमासाठी विजय सेतुपती आणि प्रियमणी सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहेत.
शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमात सुनील ग्रोव्हर, नयनतारा, योगी बाबू आणि रिद्धी डोगरा देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. जवान यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणारा शाहरुख खान याचा दुसरा सिनेमा असणार आहे. पठाण सिनेमाच्या यशानंतर ‘जवान’ सिनेमा 2 जून, 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
पठाण सिनेमा बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिल्या दिवशी सिनेमाने ५७ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ७०.५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पठाण सिनेमा रोज नवे विक्रम रचत आहे. शाहरुख खानचा हा सर्वात मोठा हीट सिनेमा ठरला आहे. स्टार्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच शाहरुखच्या सिनेमाचं कौतुक करत आहेत. तीन दिवसांत सिनेमाने जवळपास १६० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे.