Pathaan सिनेमात शाहरुख – दीपिका यांनी नाही तर, ‘या’ स्टार्सनी केलेत दमदार ॲक्शन सीन… अखेर फोटो समोर

'पठाण' सिनेमात शाहरुख - दीपिकाचे ॲक्शन सीन पाहून तुम्हीही थक्क झाले असाल? पण दमदार ॲक्शन सीन करणारे खरे स्टार 'हे' आहेत... अखेर फोटो समोर

Pathaan सिनेमात शाहरुख - दीपिका यांनी नाही तर, 'या' स्टार्सनी केलेत दमदार ॲक्शन सीन... अखेर फोटो समोर
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 10:31 AM

मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी जगभरात नवीन विक्रम रचले. २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाने नवे विक्रम रचत वेगळी ओळख निर्माण केली. सिनेमातील कलाकारांचं अभिनय, सिनेमातील गाणी… दमदार ॲक्शन सीनने चाहत्याचं मन जिंकलं. महत्त्वाचं किंग खान याचं चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण आणि सिनेमात असलेले ॲक्शन सीन.. शाहरुख, रोमान्स आणि ॲक्शन सीन.. चाहत्यांना एकत्र पाहायला मिळाल्यामुळे त्यांना प्रचंड आनंद झाला.. पण सिनेमात ॲक्शन सीन करताना दिसत असलेले शाहरुख – दीपिका नसून इतर कलाकार आहेत.

दरम्यान, शाहरुखच्या फॅन पेजवर एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये पठाण सिनेमात दमदार ॲक्शन सीन करणारे खरे स्टार दिसत आहेत. फोटोमध्ये शाहरुख आणि दीपिका बॉडी डबल्ससोबत दिसत आहेत. ज्यांनी सिनेमात ॲक्शन सीन केले आहेत. सध्या खऱ्या ॲक्शन सीन करणाऱ्या स्टार्सचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

फोटोमध्ये दीपिका – शाहरुख बॉडी डबल्स यांच्यासोबत हिरव्या स्क्रिनसमोर उभे असलेले दिसत आहेत. तर चौघांनी सारखे कपडे घातले आहेत. फोटो पाहून असं कळत आहे की, एरिअल सीन दरम्यानचा हा फोटो आहे. ज्यामध्ये दीपिका – शाहरुख विमानाला लटकून एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर जाताना दिसत आहेत. सिनेमातील ॲक्शन सीनने चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन केलं. शिवाय सिनेमातील ॲक्शन सीनची चर्चा देखील तुफान रंगली.

चार वर्षांपूर्वी शाहरुख २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. चार वर्षांनंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन देखील केलेलं नाही. पण ट्विटरवर #askSRK सेशनच्या माध्यमातून अभिनेता थेट चाहत्यांच्या संपर्कात होता.

शाहरुख खान याचा पठाण सिनेमा प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यात घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद टोकाला पोहोचला होता. अनेकांनी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी घेतली. पण कोणत्याही सिनेमाचा पठाण सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कोणताही परिणाम झालेला नाही. सिनेमाने प्रदर्शनानंतर तीन दिवसांत अनेक रेकॉर्ड मोडले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.