मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड कलाकार कायम त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात. महागड्या गाड्या, कपडे, घड्याळं इत्यादी गोष्टींमुळे सेलिब्रिटी चर्चेत असतात. बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) देखील अनेक महागड्या वस्तूंचा वापर करतो. पण शाहरुख खान कॉफी पीत असलेल्या कॉफी मगची किंमत आणि फिचर्स ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. किंग खान त्याच्या कॉफी मगवर जेवढा खर्च करतो, त्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या एक महिन्याचा खर्च तर नक्कीच निघेल. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या कॉफी मगची चर्चा रंगत आहे. किंग खान कायम त्याच्या रॉयल लाईफमुळे चर्चेत असतो.
शाहरुख खान याचा एक व्हिडीओ २०१७ मध्ये सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये अभिनेत्याच्या कॉफी मगची एक झलक चाहत्यांना पाहता आली. या व्हिडिओमध्ये तो कॉफीच्या मगमध्ये कॉफीचा एक घोट घेताना दिसत आहे. किंग खानने हा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांना या कॉफी मगची किंमत आणि त्याच्या फिचर्सबद्दल माहिती मिळाली.
व्हिडीओमध्ये किंग खान ज्या कॉफी मगचा वापर करताना दिसत आहे. त्या कॉफी मगमध्ये हिटर आणि एलईडी लाइटिंग यांसारखे फिचर्स आहे. या कॉफी मगला एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही तीन तासांपर्यंत मगचा वापर करु शकता. एवढंच नाही तर या मगसोबत चार्जिंग कोस्टरही येतो. या मगवर प्लस आणि मायनसचे चिन्ह देण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तापमान तुमच्यानुसार ठरवू शकता…
किंग खान याच्या काळ्या रंगाच्या कॉफी मगची चर्चा सध्या तुफान रंगत आहे. तुम्हालाही खास वैशिष्ट्यांसह हा कॉफी मग खरेदी करायचा असेल तर या कॉफी मगची ऑनलाइन किंमत ३५ हजार ८६२ रुपये आहे. सध्या सर्वत्र किंग खान याच्या कॉफी मगची चर्चा रंगत आहे.
शहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुख खानचा ‘जवान’ सिनेमा 7 सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘जवान’ सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण, नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘जवान’ सिनेमातील पहिलं गाणं जिंदा बंदा प्रदर्शित झालं आहे. सिनेमातील पहिल्या गाण्याचा बोलबाला सोशल मीडियावर सर्वत्र दिसून येत असून, दुसरं गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये शाहरुख आणि नयनतारा रोमान्स करताना दिसणार आहेत.