शाहरुख खान धमकी प्रकरण, वकिलालाच पोलीस कोठडी, काय आहे प्रकरण?
Shah Rukh Khan: शाहरुख खान धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर, न्यायालयाने वकिलालाच सुनावली पोलीस कोठडी काय आहे प्रकरण? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा...
Shah Rukh Khan: काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी आली होती. किंग खानला धमकी दिल्याप्रकरणी छत्तीसगडचे वकील फैजान खान याला वांद्रे न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 5 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देणारा आणि 50 लाख रुपयांची मागणी करणारा फोन आला होता…
फैजानच्या मोबाईल फोनवर कॉल ट्रेस करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी रायपूर येथून फैजान याला अटक करण्यात आली… आपला फोन चोरीला गेल्याचा दावा फैजानने केला असून त्याने तक्रार दाखल केली आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत…
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याने 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता पोलिस ठाण्यात फोन केला. फोनवर म्हणाला, शाहरुख याने मला 50 लाख रुपये दिले नाहीत, तर मी त्याला ठार करीन… धमकीनंतर शाहरुख खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली.
View this post on Instagram
याआधी देखील शाहरुख खान याला धमकी देण्यात आली होती. अंडरवर्ल्डच्या हीट लिस्टवर देखील शाहरुख खान आहे. याआधीही अभिनेत्याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही पठाण आणि जवान या सिनेमांच्या यशानंतर किंग खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या संदर्भात अभिनेत्याने महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार केली होती, त्यानंतर शाहरुखला Y+ सुरक्षा देण्यात आली होती.
सलमान खान याला धमकी आणि बाबा सिद्दीकी यांची हत्या
काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान याला धमकी आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांनी सलमान खानला मदत केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे लॉरेन्स बिश्नोई गँगने म्हटले. या प्रकरणानंतर सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता शाहरुख यालाही धमकीचा फोन आला आहे. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.