‘बेकरार करके हमें यू न जाइए…’, ‘जवान’ ला हिट करण्यासाठी किंग खान याने वापरलेल्या ट्रिक्स तुमच्या लक्षात आल्या?

...म्हणून बॉलिवूडच्या किंग खानची जागा कोणी घेवू नाही शकत; 'जवान' सिनेमाला हिट करण्यासाठी शाहरुख खान करतोय प्रयत्न... अभिनेत्याच्या खास ट्रिक्स तुम्हाला माहिती आहेत

'बेकरार करके हमें यू न जाइए…', 'जवान' ला हिट करण्यासाठी किंग खान याने वापरलेल्या ट्रिक्स तुमच्या लक्षात आल्या?
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 7:51 AM

मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. शाहरुख खान फक्त अभिनेता नसून चाहत्यांच्या मनातील भावना आहे… किंग खान याच्या चाहत्यांची आणि त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पण चाहत्यांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्यासाठी अभिनेत्याने अनेक वर्ष मेहनत घेतली. ज्यामुळे आज चाहत्यांमध्ये किंग खान याची क्रेझ दिसून येते. महत्त्वाचं म्हणजे चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्यासाठी किंग खान खास ट्रिक्स देखील वापरतो… ज्या चाहत्यांच्या लक्षात येत असतील. तर शाहरुख खान ‘जवान’ सिनेमाल हिट करण्यासाठी नक्की काय करत आहे हे जाणून घेवू…

सध्या सोशल मीडियापासून ते चाहत्यांच्या मनात फक्त आणि फक्त शाहरुख खान आहे. कारण 7 सप्टेंबर रोजी किंग खान ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी किंग खान याने अशा काही ट्रिक्सचा वापर केला आहे, ज्यांना पाहून प्रत्येकाच्या मनात फक्त आणि फक्त किंग खान आहे.

काही दिवसांपूर्वी ‘जवान’ सिनेमाचा प्रिव्ह्यू व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला, जो चाहत्यांना प्रचंड आवडला. प्रिव्ह्यूमध्ये एक सीन आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्या सीनची सध्या चर्चा रंगत आहे, तो आहे ‘बेकरार करके हमें यू न जाइए..आपको हमारी कसम लौट आइए..’ यावर किंग खान याने केलेला डान्स…

सोशल मीडियावर या सीनची क्रेझ दिसून येत आहे… किंग खान याच्या या सीनला आयकॉनिक सीन म्हटलं तरी काही हरकत नाही. महत्त्वाचं म्हणजे, सिनेमात हा सीन असणं किंग खान याची खास ट्रिक असल्याची चर्चा रंगत आहे. किंग खान याच्या सीनने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

दरम्यान, 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये देखील किंग खान याने खास ट्रिकचा वापर केला आहे. सीनमध्ये अभिनेता ट्रेन हायजॅक करतो… तेव्हा प्रशासनाकडून किंग खान याला विचारलं जातं तुला काय हवं आहे? यावर अभिनेता म्हणतो, ‘चाहिए तो आलिया भट्ट.’ शाहरुख खान याचा डायलॉग ऐकल्यानंतर हसू आवरत नाही…

सांगायचं झालं तर, ‘जवान’ सिनेमाच्या प्रिव्ह्यू आणि ट्रेलरला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. शाहरुख खान याचे अनेक सिनेमे आहेत, ज्यातील डायलॉग चाहते आजही विसरू शकलेले नाहीत… आता किंग खान याचे चाहते ‘जवान’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.