Gauri Khan च्या रेस्टॉरंटचा प्रत्येक कोपरा आलिशान, रेस्टॉरंटची एक झलक हैराण करणारी

Gauri Khan | गौरी खान हिच्या आलिशान रेस्टॉरंट 'टॉरी' ची प्रत्येक झलक हैराण करणारी, अत्यंत महत्त्वाचा आहे 'टॉरी' नावाचा अर्थ... व्हिडीओ पाहून व्हाल थक्क, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौरी खान हिच्या रेस्टॉरंटची चर्चा

Gauri Khan च्या रेस्टॉरंटचा प्रत्येक कोपरा आलिशान, रेस्टॉरंटची एक झलक हैराण करणारी
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 12:06 PM

मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची भक्कम ओळख तयार केली आहे. शाहरुख खान याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. किंग खान याच्याप्रमाणेच त्याची पत्नी गौरी खान देखील अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. गौरी खान एक उत्तम इंटेरियर डिझायनर आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घराचं इंटेरियर गौरी हिने केलं आहे.

आता गौरी हिने हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मुंबईतील जुहू याठिकाणी गौरी हिचं आर्किटेक्‍चर स्टूडियो आहे. फक्त मुंबईमध्येच नाही तर, दिल्ली आणि चंदीगड याठिकाणी देखील गौरी हिचं आर्किटेक्‍चर स्टूडियो आहेत.

गौरी हिने आता मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. गौरी खान हिच्या रेस्टॉरंटचं नाव ‘टॉरी’ असं आहे. खुद्द गौरी हिने रेस्टॉरंट ‘टॉरी’ ची एक झलक सोशल मीडियाच्याम माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये गौरीने रेस्टॉरंट ‘टॉरी’चा प्रत्येक कोपरा दाखवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

गौरी खानने तिचं पहिलं रेस्टॉरंट ‘टॉरी’ अत्यंत महागड्या वस्तूंनी सजवलं आहे. व्हिडीओमध्ये गौरी रेस्टॉरंट ‘टॉरी’बद्दल सांगताना दिसत आहे. गौरीने ‘टॉरी’ नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. ‘टॉरी म्हणजे मंदिराचा प्रवेशद्वार…’ एवढंच नाहीतर, गौरीने रेस्टॉरंटसाठी वापरण्यात आलेल्या रंगांचं देखील महत्त्व सांगितलं आहे.

गौरीने रेस्टॉरंटमध्ये लाल आणि हिरव्या रंगाचा अधिक वापर केला आहे. रेस्टॉरंटमधील वातावरण अधिक मोकळं आणि आरामदायी करण्यासाठी लाल आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. चाहत्यांना देखील गौरी खान हिचा पहिला रेस्टॉरंट प्रचंड आवडला आहे.

गौरी खान हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी गौरी हिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहे. सध्या सर्वत्र गौरी खान हिच्या रेस्टॉरंटची चर्चा रंगली आहे. जेव्हा गौरी हिने रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं, तेव्हा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

गौरी खान बॉलिवूडमधील अभिनेत्री नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक मुलाखतींमध्ये गौरी तिच्या कुटुंबासोबत सांगत असते. सोशल मीडियावर देखील गौरी खान कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरी तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सांगत असते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.