प्रिती झिंटाचा सुंदर महिलांबद्दल असा प्रश्न? शाहरुख खान म्हणाला, ‘माझं प्रेम फक्त शारीरिक संबंध…’
Preity Zinta and Shahrukh Khan Video : 'माझं प्रेम फक्त शारीरिक संबंध...', महिलांबद्दल शाहरुख खान याचं मोठं वक्तव्य, प्रिती झिंटाने सुंदर महिलांबद्दल प्रश्न विचारताच असं का म्हणाला किंग खान? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खान - प्रिती झिंटा यांच्या व्हिडीओची चर्चा...
अभिनेते शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रिती झिंटा यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडयाची. ‘दिल से’, ‘कल हो ना हो’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘वीरा जारा’ सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. बॉक्स ऑफिसवर देखील दोघांच्या सिनेमांनी तगडी कमाई केली. पण आता शाहरुख – प्रिती त्यांच्या सिनेमांमुळे नाही, एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. Reddit वर एका नेटकऱ्याने दोघांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
व्हिडीओमध्ये प्रिती किंग खान याला महिलांबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. अभिनेत्री विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शाहरुखने त्याच्या खास अंदाजात दिलं आहे. व्हिडीओ जुना असला तरी सध्या तुफान चर्चेत आहे. प्रिती विचारते, ‘आपल्या टूरमध्ये देखील जेव्हा तू कोणत्या मुलीला स्टेजवर बोलावतो, ती दिसायला फार सुंदर नसते… असं का?’
यावर किंग खान म्हणतो, ‘कारण मला त्या महिला सुंदर वाटतात. मला प्रत्येक महिला सुंदर वाटते. माझी इच्छा आहे की नेहमीच माझ्या भोवती स्त्रीया असाव्यात. महिला जागरूक, सौम्य, सॉफ्ट, सुंदर असतात… त्यांच्या उपस्थितीमुळे एखाद्याला खूप चांगलं वाटतं. महिलांसोबत असणं म्हणजे मला शारीरिक संबंध, रिलेशनशिप कोणतं नातं नको असतं. महिला कशीही असूदे मी प्रत्येक महिलेवर मनापासून प्रेम करतो.. तू जशी आहेस तशी मला आवडतेस… असं देखील अभिनेता म्हणाला.
प्रिती झिंटा आणि शाहरुख खान यांचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रिती झिंटा हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, प्रिती अभिनेता सनी देओल याच्यासोबत ‘लाहोर 1947’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
अभिनेता शाहरुख खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी किंग खानच्या प्रत्येक सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी कमाई केली. आता शाहरुख ‘किंग’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेता लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’ सिनेमानंतर किंग खान ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील शाहरुख खान याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.