‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेत्रीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर, पतीने थाटला तिसरा संसार आणि ‘ती’ मात्र एकटीच

Love Life : प्रेम असं तर नकोच..., लग्नाच्या दोन वर्षात 'शाका लाका बूम बूम' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, घटस्फोटानंतर त्याने थाटला तिसरा संसार, अभिनेत्री जगतेय एकटीच..., अभिनेत्यावर प्रेम करणं तिला पडलं महागात... अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी

'शाका लाका बूम बूम' फेम अभिनेत्रीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर, पतीने थाटला तिसरा संसार आणि 'ती' मात्र एकटीच
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 1:50 PM

मुंबई | 9 जानेवारी 2024 : प्रेमात पडल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नवे अनुभव येतात. प्रेमात कोणाला जोडीदाराची साथ आयुष्यभरासाठी मिळते, तर काही आयुष्यात मात्र फक्त आणि फक्त कटू आठवणी राहतात. असंच काही टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री आज संपत्ती, पैसा सर्वकाही असून एकटं आयुष्य जगत आहे. पण अभिनेत्रीच्या पतीने मात्र तिसरा संसार थाटला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. तिसऱ्या लग्नानंतर अभिनेत्याच्या तिसऱ्या पत्नीने एका मुलीला देखील जन्म दिला आहे. पण ‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेत्री मात्र आजही एकटीच आहे.

सध्या ज्या अभिनेत्यात्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून ‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेत्री जेनिफर विंगेट आहे. जेनिफर विंगेट हिने 2002 मध्ये प्रसारित झालेल्या ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोशल मीजियावर अभिनेत्रीचा ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील फोटो देखील तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

‘शाका लाका बूम बूम’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर जेनिफर हिने अनेक मालिकामध्ये काम केलं. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत देखील जेनिफर अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या मुलीच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर ‘सरस्वतीचंद्रा’ मालिकेत जेनिफर हिने ‘कुमुद’ या भूमिकेला न्याय दिला. अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत जेनिफर हिने चाहत्यांच्या मनात घर केलं.

जेनिफर हिला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं, पण अभिनेत्रीने खासगी आयुष्यात अनेक सकटांचा सामना केला. एकाच मालिकेत काम करत असताना जेनिफर आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्यमध्ये प्रेम बहरलं. जेनिफर आणि करण यांनी 2012 मध्ये लग्न देखील केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी 2014 मध्ये जेनिफर आणि करण यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

जेनिफर हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर करण तिसरं लग्न केलं. अभिनेत्र बिपाशा बासू हिच्यासोबत करण याने लग्न केलं. करण आणि बिपाशा यांना एक मुलगी देखील आहे. पण जेनिफर मात्र एकटीच आहे. करण याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर जेनिफर हिने लग्न केलं नाही.

करण याच्यासोबत घटस्फोटावर अभिनेत्रीचं वक्तव्य

अभिनेत्री म्हणाली, ‘इतक्या मोठ्या निर्णयासाठी आम्ही दोघेही तयार नव्हतो. आम्ही दोघेही ते पाऊल उचलायला तयार नव्हतो. आम्ही इतके दिवस मित्र होतो. प्रत्येक वेळी आम्ही भेटायचो. पण ती वेळ एक दुर्दैवी वेळ होती. जे झालं त्यात कोणाचाही दोष नव्हता…’ असं अभिनेत्री जेनिफर विंगेट म्हणाली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.