शक्ती कपूर थोडक्यात बचावले नाहीतर… पोलिसांकडून धक्कादायक खुलासा
Bollywood Actor Shakti Kapoor: बॉलीवूडचे खलनायक शक्ती कपूर यांच्यावरचं मोठं संकट टळलं, थोडक्यात बचावले अभिनेते... पोलिसांकडून धक्कादायक खुलासा, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शक्ती कपूर यांची चर्चा...
Bollywood Actor Shakti Kapoor: विनोदी कलाकार सुनील पाल आणि मुश्ताक खान यांच्या अपहरणकर्त्यांच्या निशाण्यावर बॉलीवूडचे खलनायक शक्ती कपूर देखील होते. शक्ती कपूर यांचं देखील अपहरण करण्याच्या विचारात अपहरकर्ते होते… अशी माहिती पोलिसांनी दिली. पण शक्ती कपूर थोडक्यात बचावले. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, ‘सेलिब्रिटींना कार्यक्रमाचं कारण देत बोलवायचे. त्यानंतर त्यांचं अपहरण करून त्यांच्याकडून वसुली करायचे…’
मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांनी सुनील पाल आणि मुश्ताक यांच्याकडून पैसे घेतले. तर अभिनेता राजेश पूरी याला बोलावून त्याच्यासोबत सेल्फी घेतली आणि अभिनेत्याला सोडून दिलं. सांगायचं झालं तर, सुनील पाल आणि मुश्ताक यांचं अपहरण झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेतली.
View this post on Instagram
अरुण बख्शी दिल्लीत बोलावून केली वसूली
अपहरकर्त्यांनी अरुण बख्शी यांना दिल्लीत बोलावलं त्यांच्याकडून पैसे घेतले आणि सोडून दिलं. शनिवारी अभिनेते मुश्ताक खान बिजनौरला पोहोचले आणि त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जबाब नोंदवला. मुश्ताक खान यांचे 20 नोव्हेंबर रोजी अपहरण करून त्यांना बिजनौरमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या मोबाईलमधून 2.20 लाख रुपये अपहरकर्त्यांनी घेतले.
View this post on Instagram
मुश्ताक यांचे मॅनेजर शिवम यादवने कोतवाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी पोलिस लाईन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एसपी अभिषेक झा यांनी सांगितले की, अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यातील टोळीतील सराईत गुन्हेगारासह एकूण दहा गुन्हेगार आहेत.
यापैकी माजी नगरसेवक सार्थक चौधरी उर्फ रिकी, सबीउद्दीन उर्फ सायबी, अझीम आणि शशांक या चार हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. अर्जुन कर्नावाल नावाचा एक आरोपी मेरठ पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपींकडून एक लाख चार हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. टोळीचा म्होरक्या लवी पालसह पाच अद्याप आरोपी फरार आहेत.