Mukesh Khann: ‘शक्तीमान’ चित्रपटासाठी हिंदू दिग्दर्शक हवा? अखेर मुकेश खन्ना यांनी सोडलं मौन

'शक्तीमान'साठी हिंदू दिग्दर्शकाची चर्चा; मुकेश खन्ना यांनी लिहिली भलीमोठी पोस्ट

Mukesh Khann: 'शक्तीमान' चित्रपटासाठी हिंदू दिग्दर्शक हवा? अखेर मुकेश खन्ना यांनी सोडलं मौन
Mukesh KhannaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 7:48 PM

मुंबई- ‘शक्तीमान’ (Shaktimaan) या लोकप्रिय मालिकेशी प्रत्येकाच्या काही आठवणी जोडलेल्या आहेत. हीच मालिका आता चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी पिक्चर्स इंडियाने याबद्दलची घोषणा केली. या घोषणेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. अशातच शक्तीमानच्या चित्रपटावरून काही चर्चासुद्धा होत आहेत. अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांना चित्रपटासाठी हिंदू दिग्दर्शकच हवा आहे, अशी ही चर्चा सोशल मीडियावर होतेय. यावर आता मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे.

मुकेश खन्ना यांची पोस्ट-

‘कोणता दिग्दर्शक ‘शक्तीमान’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करेल याबद्दल बोलणं खूप घाईचं ठरेल. मी आणि माझे निर्माते (सोनी अँड ब्रुईंग थॉट्स) सध्या त्यावर चर्चा करत आहोत. मात्र दिग्दर्शकाच्या धर्माबाबत आणि तो हिंदू नसल्याबाबत ज्या चर्चा होत आहेत, त्या मनाला खूप विचलित करणाऱ्या आहेत. हिंदू नसलेल्या दिग्दर्शकाबद्दल मी खूश नाही, असे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, मी असं कधीच काही बोललो नाही. त्यामुळे या चर्चा कुठून होत आहेत, हे मला ठाऊक नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

‘अशा चर्चांमध्ये कोणतंच सत्य नाही. प्रतिभावान कलाकारांसाठी माझ्या मनात खूप आदर आहे. मी त्यांच्या धर्माचा विचार करत नाही. या सर्व मूर्खपणाच्या चर्चा आहेत. शक्तीमानच्या चाहत्यांना मी विनंती करतो की त्याकडे दुर्लक्ष करावं. माझ्याकडून किंवा माझ्या निर्मात्यांकडून अधिकृतरित्या माहिती समोर आल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही अद्याप कोणत्याच दिग्दर्शकाला साईन केलेलं नाही. एखाद्याच्या क्षुल्लक खोट्यापेक्षा ही खूप मोठी गोष्ट आहे,’ अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.