Shamita Shetty | आमिर अलीला डेट करण्याच्या चर्चांवर भडकली शमिता शेट्टी; म्हणाली ‘रिॲलिटी चेक करून..’

शमिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिला अभिनेता आमिर अलीसोबत पाहिलं गेलं. शमिताच्या गालावर किस करतानाचा आमिरचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिथूनच डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. या चर्चांवर अखेर शमिताने मौन सोडलं आहे.

Shamita Shetty | आमिर अलीला डेट करण्याच्या चर्चांवर भडकली शमिता शेट्टी; म्हणाली 'रिॲलिटी चेक करून..'
Shamita ShettyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 3:12 PM

मुंबई: अभिनेत्री शमिता शेट्टी तिच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरते. बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये हजेरी लावल्यानंतर शमिताचं नाव अभिनेता राकेश बापटशी जोडलं गेलं. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही दोघं अनेकदा एकत्र दिसले. मात्र अचानक सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी ब्रेकअप केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता शमिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिला अभिनेता आमिर अलीसोबत पाहिलं गेलं. शमिताच्या गालावर किस करतानाचा आमिरचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिथूनच डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. या चर्चांवर अखेर शमिताने मौन सोडलं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट लिहित शमिताने नेटकऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ‘हा समाज आणि त्याची सोयीस्कर मानसिकता माझ्यासाठी अनाकलनीय आहे. कोणतंही रिॲलिटी चेक न करता प्रत्येक कृती आणि प्रत्येक व्यक्तीबाबत का मतं बनवली जातात? नेटकऱ्यांच्या संकुचित मानसिकतेपलीकडेही बऱ्याच शक्यता असतात’, अशी पोस्ट शमिताने लिहिली.

हे सुद्धा वाचा

आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल तिने पुढे लिहिलं, ‘आपली मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे. मी सिंगल आणि खुश आहे. त्यामुळे या देशातील इतर महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करुयात.’

शमिता आणि आमिर यांना एकत्र पार्टी करताना पाहिल्यानंतर दोघांविषयी सोशल मीडियावर चर्चा होऊ लागल्या. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आमिर शमिताला तिच्या कारपर्यंत घेऊन जाताना दिसतो आणि त्यानंतर तिच्या गालावर किस करतो.

याआधी शमिता अभिनेता राकेश बापटला डेट करत होती. बिग बॉसच्या घरात हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. तर दुसरीकडे नऊ वर्षांच्या संसारानंतर आमिरने पत्नी संजीदा शेखला घटस्फोट दिला. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत आमिरने या घटस्फोटाचा खुलासा केला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.