अबब ! शनाया कपूरने एवढ्या महाग बिकिनीवर केले फोटोशूट, किंमत तब्बल….

शनाया कपूर (Shanaya Kapoor) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे विविध फोटो शेअर करत असते.

अबब ! शनाया कपूरने एवढ्या महाग बिकिनीवर केले फोटोशूट, किंमत तब्बल....
शनाया कपूरने एवढ्या महाग बिकिनीवर केले फोटोशूट
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 8:46 PM

मुंबई : सिनेअभिनेते आणि त्यांची मुलं महागडे कपडे, स्टायलिश शूज, महागडे मोबाईल अशा वेगवेगळ्या वस्तू वापरुन एक वेगळ्या स्वॅगमध्ये राहतात. प्रेक्षकांना किंवा चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी ते अशा प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करतात. याशिवाय अभिनेता किंवा अभिनेत्री म्हटल्यावर ‘स्टाईल में रहने का’ हे ब्रीदवाक्य त्यांच्या आयुष्याचं समीकरण असतं. अर्थात यात काही अपवाद आहेत. मात्र, असे अनेक अभिनेते-अभिनेत्रींचे फोटो आपण सोशल मीडियावर बघतो. तसेच काहीसे फोटो बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) हीने सोशल मीडियावर शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे.

शनायाची इन्साग्राम पोस्ट

शनाया (Shanaya Kapoor) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे विविध फोटो शेअर करत असते. यामध्ये तिचे अनेक बोल्ड फोटोज देखील आहेत. विशेष म्हणजे ते फोटो बघितल्यानंतर शनाया आपल्या नव्या स्टाईलसाठी वेगवेगळे एक्सपरिमेंट करते, असं लक्षात येईल. शनायाने इन्स्टाग्रामवर बिकिनी लुक्सचे देखील फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तिने श्रग आणि नेकपीस परिधान करुन बिकिनी लुकला वेगळा टच दिलाय.

बिकिनीची किंमत तब्बल….

फोटोमध्ये दिसणारी ही बिकिनी प्रचंड महाग आहे. विशेष म्हणजे सध्या प्रिंट बिकिनी प्रचंड ट्रेडिंगमध्ये आहे. या ट्रेंडला फॉलो करत शनायाने प्रिंट बिकिनी आणि प्रिंटेग श्रग परिधान करत फोटोशूट केला आहे. ही बिकिनी Barocco mosaic प्रिंट बिकिनी Versace ब्रँडची आहे. या बिकिनीची टॉप किंमत ही 45 हजार 500 रुपये आहे. तर बॉटम किंमत ही 36 हजार 300 रुपये आहे. म्हणजेच बिकिनी सेट एकूण किंमत ही 90 हजार रुपयांपर्यंत आहे.

शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची सिनेसृष्टीत चर्चा आहे. शनाया यावर्षी कुठल्यातरी मोठ्या सिनेमात झळकणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली शनायाला लॉन्च करण्याची घोषणा केली. त्यामुळे शनाया चर्चेत आलीय. सोशल मीडियावर अनेकजण शनाया कपूरच्या नावाने सर्च करत आहेत. तिच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा : Photo : काजल अग्रवालचा सोशल मीडियावर धमाका | Kajal Agarwal’s pictures on social media, see photo | TV9 Marathi

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.