‘काँग्रेसने काय वाटोळं केलं ते…’, शरद पोंक्षे यांची लक्षवेधी पोस्ट तुफान व्हायरल
Sharad Ponkshe | सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) फक्त त्यांच्या अभिनयामुळेच नाही तर, सडेतोड वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात... शरद पोंक्षे कायम महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असतात... आता देखील शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे... सध्या सर्वत्र त्यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे..
मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. आता देखील शरद पोंक्षे यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. शरद पोंक्षे यांनी पोस्ट करत प्रेक्षकांना ‘आर्टिकल 370 ‘ सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाला आहे.
प्रेक्षकांना ‘आर्टिकल 370 ‘ सिनेमा पाहण्याचं आवाहन करत शरद पोंक्षे म्हणाले, ‘Netflix वर आता तूम्ही हा सिनेमा पाहू शकता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सरकारने काय पावल ऊचलली?कॉंग्रेसने काय वाटोळं केल ते कळेल.कोणी म्हणेल की खोटा ईतिहास दाखवलाय ज्याला जे म्हणायच ते म्हणू दे पण प्रत्येकान पाहिला पाहिजे. आणि हो मतदान मात्र नक्की करा. राष्ट्रसर्वतोपरी…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शरद पोंक्षे यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
यामी गौतम स्टारर ‘आर्टिकल 370 ‘ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. आर्टिकल 370 काय होतं आणि ते रद्द करणं का गरजेचं होतं, हे जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा आवर्जून पहा, असं अनेकांनी म्हटलंय. शरद पोंक्षे यांच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी देखील सिनेमा पाहण्यासाठी आवाहन करत आहेत.
‘आर्टिकल 370 ‘ सिनेमात अभिनेत्री यामी गौतम हिच्यासोबत सिनेमात ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसले. वैभव तत्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार, राज अर्जुन, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.
‘आर्टिकल 370 ‘ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली. ‘आर्टिकल 370’ या सिनेमात भारतीय संविधानातील आर्टिकल 370 संबंधित कथा दाखवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये काय स्थिती होती आणि आर्टिकल 370 हटवण्यासाठी काय-काय करावं लागलं हे सर्व या सिनेमातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे. आता सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झाल्यामुळे तुम्ही घर बसल्या सिनेमा पाहू शकता…