Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shark Tank India 2: एकाला 102 कोटी, तर दुसऱ्याला 5 हजार कोटींचा फटका; ‘शार्क टँक इंडिया’च्या परीक्षकांचाच बिझनेस तोट्यात

दुसऱ्यांना बिझनेसची शिकवण देणाऱ्या 'शार्क टँक इंडिया'च्या परीक्षकांचा स्वत:चा बिझनेस मात्र तोट्यात; जाणून घ्या कोणाला बसला किती कोटींचा फटका?

Shark Tank India 2: एकाला 102 कोटी, तर दुसऱ्याला 5 हजार कोटींचा फटका; 'शार्क टँक इंडिया'च्या परीक्षकांचाच बिझनेस तोट्यात
Shark Tank India 2: एकाला 102 कोटी, तर दुसऱ्याला 5 हजार कोटींचा फटका; 'शार्क टँक इंडिया'च्या परीक्षकांचाच बिझनेस तोट्यातImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 12:45 PM

मुंबई: ‘शार्क टँक इंडिया’चा दुसरा सिझनसुद्धा पहिल्या सिझनप्रमाणेच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या नव्या सिझनमध्ये काही बदल करण्यात आल आहेत. शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ‘भारत पे’चा सहसंस्थापक अश्नीर ग्रोवर नाहीये. पहिल्या सिझनमधला तो सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा होता. त्यांची जागा आता ‘कार देखो’चा सीईओ अमित जैनने घेतली आहे. या शोला जरी रेटिंग चांगली मिळत असली तरी सोशल मीडियावर एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. शार्क टँक इंडियाचे परीक्षक हे शो चालवण्याच्या लायकीचे नाहीत, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

या चर्चेची सुरुवात लेखक अंकित उत्तम यांच्या पोस्टमुळे झाली. अंकित यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवर शार्क टँक इंडियाच्या परीक्षकांविषयी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने या परीक्षकांच्या बिझनेसची पोलखोल केली आहे. फक्त एक परीक्षक सोडता शार्क टँक इंडिया 2 च्या बाकी सर्व परीक्षकांचा बिझनेस तोट्यात असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यांना शेकडो ते हजारो कोटी रुपयांचा नुकसान सहन करावा लागला आहे, असा खुलासा त्याने केला आहे.

अंकित यांनी शार्क टँक अमेरिकेशी शार्क टँक इंडियाची तुलना केली. ‘शार्क टँक अमेरिका’च्या परीक्षकांचा व्यवसाय चांगला नफा कमवत असल्याचं त्याने म्हटलंय. तर दुसरीकडे शार्क टँक इंडियाच्या परीक्षकांच्या कंपन्या तोट्यात आहेत. विनिता सिंहची शुगर कॉस्मेटिक्स, गजल अलघची ममाअर्थ, अश्नीर ग्रोवरचा भारत पे, अनुपम मित्तलचा शादी डॉटकॉम, पियुश बंसलचा लेन्सकार्ट आणि अमित जैनचा कारदेखो या कंपन्या तोट्यात असल्याचं अंकित यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

विनिता सिंहच्या शुगर कॉस्मेटिकला 2022 मध्ये 75 कोटी रुपयांचं नुकसान

गजल अलघच्या ममाअर्थला 14.44 कोटी रुपयांचा फायदा

मात्र 2021 मध्ये 1332 कोटी आणि 2020 मध्ये 428 कोटी रुपयांचं नुकसान

अश्नीर ग्रोवरच्या ‘भारत पे’चं 2022 मध्ये 5594 कोटी रुपयांचं नुकसान

अनुपम मित्तलच्या ‘शादी डॉटकॉम’ आणि ‘मकान डॉटकॉम’ या कंपन्या बुडाल्यात जमा

पियुश बंसलच्या ‘लेन्सकार्ट’ला 2022 मध्ये 102.3 कोटी रुपयांचा तोटा

अमित जैनच्या ‘कारदेखो’ कंपनीचा 246.5 कोटी रुपयांचा तोटा

अंकित यांच्या मते नमिता थापरच्या ‘एमक्योर फार्मा’ या कंपनीची स्थापना तिच्या वडिलांनी केली. या कंपनीत नमिता फक्त गादीवर बसली आहे. नमितावर त्यांनी घराणेशाहीची टिप्पणी केली आहे. यादरम्यान फक्त अमन गुप्ताच्या ‘बोट’ या कंपनीचाच फायदा झाला असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.