‘बॉलिवूडमध्ये महिलांसाठी फक्त…’, अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत शर्मिला टागोर असं का म्हणाल्या?

अनेक वर्ष बॉलिवूडपासून दूर असलेल्या शर्मिला टागोर यांनी घेतली स्पष्ट भूमिका; महानायक अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत म्हणाल्या...

'बॉलिवूडमध्ये महिलांसाठी फक्त...', अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत शर्मिला टागोर असं का म्हणाल्या?
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 5:11 PM

Sharmila Tagore on Bollywood : अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहेत. पण आता त्यांनी बॉलिवूडबद्दल एक मोठं सत्य उघड केलं आहे. शर्मिला टागोर यांनी बॉलिवूडमध्ये अद्याप अनेक गोष्टी बदललेल्या नाहीत असं सांगितलं. शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘आज सिनेमांमध्ये दमदार भूमिका पुरुष वर्गाकडे असतात. बॉलिवूडमध्ये उत्तम भूमिका कायम अभिनेत्यांसाठी असतात. महिसांसाठी भूमिका फार साध्या असतात.’ असं देखील शर्मिला टागोर म्हणाल्या. शिवाय बॉलिवूडचं सत्य सांगताना त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. (Sharmila Tagore on bollywood)

शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘बॉलिवूडमध्ये आजही वयामुळे भेदभाव केला जातो. कारण दमदार भूमिका कायम अभिनेते करताना दिसतात. एवढंच नाही तर, अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांसारख्या अभिनेत्यांसाठी एक विशेष स्क्रिप्ट लिहिली जाते. पण वहीदा रहमान आणि अन्य महिला कलाकारांसोबत असं होत नाही.’ असं देखील शर्मिला टागोर म्हणाल्या. (sharmila tagore father and grandfather)

हे सुद्धा वाचा

बॉलिवूडबद्दल सांगताना शर्मिला टारोग यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘कलाकारांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म एक उत्तम माध्यम आहे. आमच्यासारख्या वयस्कर अभिनेत्रींसाठी वेगळी आणि दमदार स्क्रिप्ट तयार केली जात नाही. नीना गुप्ता एक उत्तम कलाकार आहे आणि त्यांच्याप्रमाणे आणखी अभिनेत्री देखील आहेत. पण त्यांना स्वतःचं अभिनय सादर करण्यासाठी सर्वांना संधी मिळेत नाही. ओटीटी उत्तम माध्यम आहे. पण काही गोष्टी सुधारण्यासाठी आणखी काळ लागेल.’ असं देखील शर्मिला टागोर म्हणाल्या.

शर्मिला टागोर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्षांनंतर त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. शर्मिला टागोर राहुल व्ही चित्तेला यांच्या फॅमिली ड्रामा ‘गुलमोहर’ मधून पुन्हा अभिनय करताना दिसणार आहेत. ‘गुलमोहर’मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी शर्मिला टागोर यांचा मुलगा अरुणच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘गुलमोहर’ 3 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळे अनेक वर्षांनंतर शर्मिला टागोर यांना चाहत्यांना पडद्यावर पहाता येणार आहे. सध्या सर्वत्र शर्मिला टागोर यांच्या बहुप्रतिक्षीत ‘गुलमोहर’ची चर्चा रंगत आहे. त्यामुळे शर्मिला टागोर यांना पुन्हा अभिनय करताना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (sharmila tagore bollywood film)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.