माझ्याकडून काही चुका..; सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?

| Updated on: May 17, 2024 | 9:59 AM

'मदर्स डे'निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या त्यांच्या आई होण्याच्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. सैफच्या जन्मानंतर जवळपास सहा वर्षे मी त्याला पुरेसा वेळ देऊ शकले नाही, असं त्यांनी सांगितलं.

माझ्याकडून काही चुका..; सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?
Saif Ali Khan and Sharmila Tagore
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी क्रिकेटर मन्सूर अली खान यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना सैफ अली खान हा मुलगा आणि सोहा अली खान, सबा अली खान या दोन मुली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला यांनी आई म्हणून काही चुका केल्याची कबुली दिली. ज्यावेळी सैफचा जन्म झाला, तेव्हा त्या फिल्म इंडस्ट्रीत दोन शिफ्ट्समध्ये काम करत होत्या. मुलाच्या जन्मानंतर त्या सहा वर्षे त्याच्यापासून लांब राहिल्या होत्या. मुलासोबत पुरेसा वेळ व्यतित करू न शकल्याची खंत त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली.

शर्मिला टागोर म्हणाल्या, “जेव्हा सैफचा जन्म झाला, तेव्हा मी खूप व्यस्त होते. एका दिवसात मी दोन शिफ्टमध्ये काम करत होते. त्याच्या आयुष्याच्या पहिल्या सहा वर्षांत मी त्याच्यापासून लांबच होते. एक आई म्हणून माझ्या ज्या जबाबदाऱ्या होत्या, त्या मी पूर्ण केल्या होत्या. मी त्याच्या शाळेत पालकांच्या मिटींगसाठी जायचे, त्याच्या विविध कार्यक्रमांना मी उपस्थित राहायची. पण त्याच्यासाठी मी कधीच फुल-टाइम आई नव्हती. माझे पती त्याच्यासोबत होते, पण मी नव्हती. नंतर जेव्हा माझ्यातील मातृत्व जागृत झालं, तेव्हा मी खूपच अतिउत्साही आई बनले. त्याला जेवण भरवणं, अंघोळ घालणं या सर्व गोष्टी मला करायच्या होत्या. ही नाण्याची दुसरी बाजू होती. पण प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, मी काही चुका केल्या आहेत.”

हे सुद्धा वाचा

“असं असूनही सैफ बिघडला नाही. माझे पती त्याच्यासोबत असायचे आणि इतक कुटुंबीय, मित्रमैत्रिणींकडूनही आम्हाला खूप साथ मिळाली. त्याच्या शाळेतील एक शिक्षिका मुंबईतील आमच्या घराजवळच राहायची. ती आणि तिच्या पतीने सैफची खूप काळजी घेतली. नंतर सोहा आणि सबाच्या वेळी माझ्याकडे बराच मोकळा वेळ होता”, असं त्यांनी पुढे सांगितलं. सैफच्या जन्मानंतर शर्मिला टागोर या फिल्म इंडस्ट्रीत नॉन-स्टॉप काम करत होत्या. पण इतर दोन मुलींच्या जन्मानंतर त्यांचं हे काम बऱ्याच अंशी कमी झालं होतं. सुरुवातील सलग तीन-चार दिवस सैफला भेटता यायचं नाही, असंही त्यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं.