Amitabh Bachchan | हुबेहूब बिग बी यांच्यासारखा दिसणारा पुण्यातील माणूस कोण? तुम्हीही ओळखू शकणार नाही
Amitabh Bachchan | पुण्यातील 'हा' माणूस नक्की आहे तरी कोण? जो हुबेहूब बिग बी यांच्यासारखा दिसतो... फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील गोंधळून जाल... सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची चर्चा...
मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहते फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील आहेत. अमिताभ बच्चन यांच्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक नव्या अभिनेत्यांनी पदार्पण केलं. पण बिग बी यांची जागा कोणताही अभिनेता घेवू शकला नाही… वयाच्या ८० व्या वर्षी देखील बिग बी बॉलिवूड आणि सोशल मीडियावर सक्रिय असतात. अभिनय, असंख्या डायलॉग इत्यादी गोष्टींमुळे अमिताभ बच्चन कायम चर्चेत असतात. पण आता बिग बी कोणत्या सिनेमामुळे किंवा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले नसून हुबेहूब त्यांच्यासारख्या दिसणार एका व्यक्तीमुळे चर्चेत आले आहे. हुबेहूब बिग बी यांच्यासारखा व्यक्ती पुण्यातील असून त्यांचं नाव शशिकांत पेडवाल असं आहे.
शशिकांत पोडवाल हुबेहूब बिग बी यांच्यासारखे दिसतात. शशिकांत पेडवाल यांचा चेहरा अमिताभ बच्चन यांच्यासारखाच आहे. पोडवाल यांचे फोटो पाहून खुद्द अमिताभ बच्चनही थक्क झाले होते. शशिकांत हे मिमिक्री आर्टिस्ट देखील आहेत आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध स्टार्सची नक्कल करतात.
बिग बी यांच्यासरखे दिसत असल्यामुळ शशिकांत यांना प्रसिद्ध मिळत असली तरी, शशिकांत बिग बींचे मोठे चाहते आहेत. सोशल मीडियावर शशिकांत यांचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात. शशिकांत पेडवाल हे पुण्याच्या आयटीआय शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. नुकताच शशिकांत यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
शशिकांत पोडवाल म्हणाले, ‘मी आयटीआय सेक्टरमध्ये काम करतो. प्रत्येक चार – वर्षांमध्ये माझी बदली होत असते. जेव्हा माझी बदली जळगाव याठिकाणी झाली होती तेव्हा, खान्देश फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या महोत्सवाच्या समितीत मी देखील होतो. मला सांगण्यात आलं की कार्यक्रमादरम्यान श्रेया घोषाल हिला १५ मिनिटांचा ब्रेक द्यावा लागेल..
‘तेव्हा मंचावर काय करायचं असा प्रश्न सर्वांना पडला होता… तेव्हा मी म्हणालो अमिताभ बच्चन यांना बोलवू… पण आयोजकांकडे पुरेला फंड नसल्यांमुळे त्यांनी नकार दिला.. तेव्हा मी म्हणालो, मी बोलावतो ते माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांना माझे व्हिडीओ दाखवले आणि सांगितलं हे बिग बी नाही तर मी आहे.. तेथे जवळपास ४० हजार लोकं होती… ‘
‘१५ मिनिटं सादरीकरण केल्यानंतर पहिल्यांदा संपूर्ण मीडिया माझ्या मागे होता… तेव्हा मला सर्वांना सांगावं लागलं मी अमिताभ बच्चन नाही, माझं नाव शशिकांत आहे.. त्यानंतर न्यूजपेपरमध्ये देखील माझं नाव आलं होतं.’ असं देखील शशिकांत म्हणाले. एवढंच नाही तर, त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्या भेटीबद्दल सांगितलं आहे.
शशिकांत पोडवाल आणि अमिताभ बच्चन यांची पहिली भेट २०११ मध्ये झाली होती. शशिकांत म्हणाले, ‘माझ्याकडे माझ्या फोटोंचा पूर्ण अल्बम होता. तेव्हा मी मेकअप केला नव्हता. बिग बी भेटले तेव्हा मला आनंद झाला. त्यांना मी सर्व फोटो दाखवले… ते देखील प्रचंड आनंदी झाले… पण जेव्हा मी त्यांना सांगितलं, हे तुमचे फोटो नसून माझे फोटो आहेत. तेव्हा त्यांना थक्का बसला…’
‘मी अमिताभ बच्चन यांना सांगितलं मी हुबेहूब तुमच्या सारखा दिसतो.. जेव्हा मी मेकअप करतो… तेव्हा बिग म्हणाले, तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर कोणाला माहिती देखील नाही पडणार… अशात मी त्यांनी सांगितलं तुमच्या परवानगी शिवाय नाही येणार…’ सध्या सर्वत्र शशिकांत यांची चर्चा रंगली आहे. जेव्हा शशिकांत १० वी इयत्तेत होते, तेव्हा अनेक जण त्यांना म्हणाचे तू हुबेहूब बिग बी यांच्यासारखा दिसत आहेस…