Aishwarya-Abhishek यांच्या लग्नातील वाद, ‘या’ सुपरस्टारच्या संपूर्ण कुटुंबाने का टाकला लग्नावर बहिष्कार?

Aishwarya Rai -Abhishek Bachchan: सलमान खान, विवेक ओबेरॉय यांच्या कुटुंबाने नाही तर, बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या संपूर्ण कुटुंबाने टाकला होता ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नावर बहिष्कार?, सध्या सर्वत्र ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नाची चर्चा...

Aishwarya-Abhishek यांच्या लग्नातील वाद, 'या' सुपरस्टारच्या संपूर्ण कुटुंबाने का टाकला लग्नावर बहिष्कार?
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 11:15 AM

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला आता 16 वर्ष झाली आहे. 2007 मध्ये अभिषेक – ऐश्वर्या यांचं लग्न कुटुंबियांच्या उपस्थितीत झालं. ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नात बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना देखील निमंत्रण नव्हतं अशी देखील माहिती समोर आली. अनेक मित्र-परिवाराला लग्नात निमंत्रित न केल्यामुळे बच्चन कुटुंबियांनी सर्वांच्या घरी एक कार्ड आणि मिठाई पाठवली होती. पण बच्चन कुटुंबियांच्या पाहुण्यांमध्ये असं एक कुटुंब होतं, ज्यांनी अभिषेक – ऐश्वर्या यांच्या लग्नाची मिठाई देखील स्वीकारली नाही आणि बच्चन कुटुंबियांच्या घरी पुन्हा पाठवून दिली.

सध्या ज्या कुटुंबाची चर्चा रंगत आहे ते कुटुंब दुसरं तिसरं कोणी नाही तर, सिन्हा कुटुंब आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिषेक याच्या लग्नाची मिठाई परत पाठवली होती. सांगायचं झालं तर, महानायक अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉम्बे टू गोवा, काला पत्थर, नसीब, शान आणि दोस्ताना यांसाख्या सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली होती. त्यामुळ दोन स्टारमध्ये संबंध देखील चांगलं होते.

असं असताना देखील अभिषेक – ऐश्वर्या यांच्या लग्नत निमंत्रित न केल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा नाराज होते. याचा खुलासा खुद्द अभिषेक याने केला होती. 2007 मध्ये अभिनेत्याची आजी तेजी बच्चन यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. याच कारणामुळे अभिषेक – ऐश्वर्या यांचं लग्न फार कमी पाहुण्याच्या उपस्थितीत पार पडलं. पण सर्वांचे आशीर्वाद मिळावे म्हणून बच्चन कुटुंबियांनी सर्वांच्या घरी मिठाई पाठवली होती.

हे सुद्धा वाचा

अभिषेक म्हणाला होता, ‘एक अत्यंत प्रामाणिक कारण लोकं फार सहज विसरुन जातात. माझ्या कुटुंबाला लग्न गुपित ठेवायचं होते. त्यामागे कारण माझी आजी होती. माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, कुटुंबातील एक व्यक्ती आजारी असताना मोठ्या जल्लोषात लग्न करणं योग्य नाही…’

‘सर्वांच्या घरी आम्ही मिठाई आणि एक कार्ड पाठवला होता. सर्वांनी मिठाईचा प्रेमाने स्वीकार करत आम्हाला आशीर्वाद दिले. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी मिठाई परत केली. आम्ही देखील त्याचा प्रेमाने स्वीकार केली. आयुष्यात आपण सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही…’ असं देखील अभिषेक बच्चन म्हणाला.

अभिषेक-ऐश्वर्या यांच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांचं वक्तव्य

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते, ‘लग्नाला बोलावलं नाही तर, मिठाई कशाला? मला कधीच दुसऱ्या स्थानावर राहायला आवडत नाही आणि मिठाई स्वीकारून मी त्यांना लाजवणार नाही. मिठाई पाठवण्यापूर्वी मला कुटुंबातील कोणीतरी फोन तरी करायला हवा होता… फोन देखील आला नाही, मग मिठाई कशाला?’ असा प्रश्न देखील शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला. सांगायचं झालं तर, सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात देखील बच्चन कुटुंबियांपैकी कोणी नव्हतं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.