सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नामुळे ‘या’ठिकाणी खळबळ, शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘माझ्या मुलीने बेकायदेशीर…’
Sonakshi Sinha Marriage | सोनाक्षी - झहीर यांच्या लग्नामुळे 'या'ठिकाणी वातावरणा तापलं, अनेक जण म्हणाले, 'लव्ह जिहाद...', संतापात शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'माझ्या मुलीने बेकायदेशीर...', शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने रविवारी अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं आहे. सोनाक्षी – झहीर यांनी हिंदू किंवा मुस्लिम पद्धतीने नाही तर रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केलं आहे. दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे सोनाक्षी सिन्हा हिला मोठ्या प्रमाणात ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाही तर, सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नामुळे त्यांच्या मूळ गावी पाटणामध्ये खळबळ उडाली आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्या मूळ राज्य बिहारमध्येही निदर्शने झाली. लोकांनी आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हटलं असून बिहारमध्ये सोनाक्षीवर बंदी घालण्याची मागणी केली. हिंदू शिवभवानीने आयोजित केलेल्या निषेधात शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे त्यांची मुलं लव आणि कुश यांची नावे बदलण्याची मागणी केली होती.
दरम्यान सतत होणाऱ्या ट्रोलिंगनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न म्हणाले, ‘आनंद बख्शी साहेबांनी लिहिलं आहे, ”कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’, याला जोडून मला देखील काही म्हणायचं आहे, ‘कहने वाले अगर बेकार, बेकाम-काज के हों तो कहना ही काम बन जाता है”
पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘माझ्या मुलीने काहीही बेकायदेशीर किंवा असंवैधानिक काम केलेलं नाही. लग्न दोन लोकांमधील खासगी निर्णय आहे. कोणाला देखील यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मी सर्व आंदोलकांना सांगतो – स्वतःचं आयुष्य जगा आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी करा… बाकी मला काहीही बोलायचं नाही..’ असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न…
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 मध्ये लग्न केलं. जवळपास 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर देखील सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालयांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. रजिस्टर्ड पद्धतीने लग्न झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शिवाय खुद्द सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी देखील सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.