सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत करणार लग्न? लग्नावर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Sonakshi Sinha Marriage | अफवा खऱ्या आहेत... प्रपोजल, रोका, मेहेंदी, लग्न... सर्वकाही ठरलं आहे..., लग्नावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची प्रतिक्रिया, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची चर्चा... कुटुंबात आनंदाचं वातावरण...
बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींप्रमाणे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. लग्नामुळे अभिनेत्रीच्या घरात देखील आनंदाचं वातावरण आहे.सोनाक्षी सिन्हा जून महिन्यातील 23 तारखेला नव्या आयुष्याची सुरुवात करणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाक्षी आणि इक्बाल एकमेकांना डेट करत आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.
लग्नाच्या चर्चा रंगत असताना सोनाक्षी सिन्हा हिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोनाक्षी लग्न, रोका, मेहेंदी इत्यादी गोष्टींवर प्रतिक्रिया देताना दिसली. सोनाक्षी म्हणाली होती, ‘का हात धुवून माझ्या लग्नाच्या मागे लागला आहेत?’ कॅप्शन मध्ये अभिनेत्री म्हणाली होती, ‘प्रपोजल, रोका, मेहेंदी, संगीत सर्वकाही ठरलं आहे… कृपया तुम्हीच मला सांगा…’
View this post on Instagram
अभिनेत्रीचा जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. येत्या 23 तारखेला सोनाक्षी लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोनाक्षी बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार आहे… अशी माहिती समोर येत आहे. पण दोघांनी देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये कपिलने अभिनेत्रीला लग्न कधी करतेय? असं विचारलं होतं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘जखमेवर मीठ चोळू नको… तुला माहिती आहे मला लग्नाची किती घाई आहे…’ सध्या सर्वत्र सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. कशी असेल सोनाक्षी हिच्या लग्नाची पत्रिका?
सोनाक्षी हिच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका मॅगझीनच्या मुखपृष्ठाप्रमाणे डिझाइन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पत्रिकेवर ‘अफवा खऱ्या आहेत.’ असं लिहिण्यात आलं आहे. मुंबईत लग्नसोहळा साजरा केला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.