Shatrughan Sinha: कशी आहे शत्रुघ्न सिन्हांची प्रकृती? स्वतःच फोटो पोस्ट करत म्हणाले…
Shatrughan Sinha Health: 'सर्व वाद आणि...', शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीची सर्वांना चिंता, आता कसे आहेत अभिनेते? फोटो पोस्ट करत स्वतःच दिली मोठी अपडेट, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शत्रुघ्न सिन्हा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा... आता व्हायरल होत असलेल्या फोटोची चर्चा...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. आता देखील शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अभिनेते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात पोहोचल्याची माहिती मिळत होती, पण त्यांना ताप असल्यामुळे रुग्णालायात दाखल केल्याची माहिती मुलगा लव सिन्हा याने दिली.
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी सोशल मीडियावर एका फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वतःबद्दल चाहत्यांना माहिती देखील दिली. फोटोमध्ये शत्रुघ्न सिन्हा कुटुंबिय आणि मित्रांसोबत बसलेले दिसत आहेत. फोटो पोस्ट करत शत्रुघ्न सिन्हा यांनी लक्षवेधी कॅप्शनही लिहिलं आहे.
Away from the ‘controversy & confusion’ created by some of our good friends from the social media/Youtubers. The fact is enjoying with best of our family members, brothers & dear friends. Enjoying the most talked about International Cricket match between #SouthAfrica & #India.… pic.twitter.com/tASio9FaeM
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) July 1, 2024
शत्रुघ्न सिन्हा एक्सवर (ट्विटर) म्हणाले, ‘सर्व वाद आणि गोंधळापासून दूर… माझ्या मित्रांसोबत… सत्य असं आहे की, मी माझ्या मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत T20 वर्ल्ड कप सामन्याचा आनंद घेतला.’ शत्रुघ्न सिन्हा यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीबद्दल काय म्हणाला होता लव सिन्हा?
ताप असल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनाक्षी हिच्या लग्नानंतर वडिलांची प्रकृती खालावली होती. ताप असल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहेत. त्यामुळे आम्ही वडिलांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला… असं लव सिन्हा म्हणाला असल्याची माहिती समोर आली होती.
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली. सांगायचं झालं तर, नुकताच शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. ज्यामुळे अनेकांनी सिन्हा कुटुंबियांना ट्रोल देखील केलं.
सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल यांनी हिंदू किंवा मुस्लीम पद्धतीने नाही तर, रजिस्टर मॅरिज केलं. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 मध्ये लग्न केलं.