बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच मुलगा सोनाक्षी सिन्हा हिचं लग्न बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लावून दिलं. झहीर आणि सोनाक्षी यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. मुलीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अभिनेते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात पोहोचल्याची माहिती मिळत होती, पण आता यामागचं मोठं कारण समोर येत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव याने वडिलांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत लव याने वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. ताप असल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनाक्षी हिच्या लग्नानंतर वडिलांची प्रकृती खालावली होती. ताप असल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहेत. त्यामुळे आम्ही वडिलांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.
शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे… अशी माहिती देखील लव सिन्हा यांनी दिली आहे. सांगायचं झालं तर, नुकताच, सोनाक्षी हिचा एका व्हिडीओ समोर आला. सोनाक्षी वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पती झहीर याच्यासोबत रुग्णालयात पोहोचली होती.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली. अनेक चाहत्यांनी शत्रुघ्न सिन्हा लवकरात-लवकर ठिक व्हावे यासाठी प्रार्थना देखील केली आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
सांगायचं झालं तर, सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा आनंदी दिसत होते. त्यांनी मुलीला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देखील दिल्या. शिवाय ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देखील दिलं. ‘माझ्या मुलीने काहीही बेकायदेशीर किंवा असंवैधानिक काम केलेलं नाही. लग्न दोन लोकांमधील खासगी निर्णय आहे. कोणाला देखील यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मी सर्व आंदोलकांना सांगतो – स्वतःचं आयुष्य जगा आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी करा… बाकी मला काहीही बोलायचं नाही..’ असं सिन्हा एका मुलाखतीत म्हणाले.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 मध्ये लग्न केलं. जवळपास 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रजिस्टर्ड पद्धतीने दोघांनी लग्न केलं. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.