हा बिहारी, गल्लीतला गुंड…; पूनम सिन्हा यांच्या आईने शत्रुघ्न सिन्हांना केलं होतं रिजेक्ट

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला. पत्नी पूनम यांच्या आईने शत्रुघ्न सिन्हा यांचं स्थळ स्पष्टपणे नाकारलं होतं.

हा बिहारी, गल्लीतला गुंड...; पूनम सिन्हा यांच्या आईने शत्रुघ्न सिन्हांना केलं होतं रिजेक्ट
शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 11:41 AM

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये सिन्हा कुटुंबीय पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. शत्रुघ्न सिन्हा, त्यांची पत्नी पूनम सिन्हा, मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि जावई झहीर इक्बाल यांनी या एपिसोडमध्ये खूप धमाल केली. त्याचसोबत त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही काही खुलासे केले. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगताना दिसत आहेत. पूनम यांच्या आईने सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत मुलीच्या लग्नाला स्पष्ट नकार दिला होता. हाच किस्सा त्यांनी सविस्तर सांगितला आहे.

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अर्चना पुरण सिंह विचारतात, “पूनम.. तुम्ही आधी शत्रुजींना प्रपोज केलं होतं की त्यांनी आधी तुम्हाला लग्नासाठी विचारलं होतं?” यावर शत्रुघ्न सिन्हा लगेच म्हणाले, “त्यांनी माझ्याकडून प्रपोज करवून घेतलं.” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. त्यानंतर पूनम सांगतात, “त्यांचे मोठे भाऊ माझ्या घरी माझ्या आईशी बोलायला आले होते. तेव्हा माझ्या आईने स्पष्ट नकार दिला होता. आम्हाला फिल्म इंडस्ट्रीतला मुलगाच नकोय, असं आई म्हणाली.”

हे सुद्धा वाचा

हाच किस्सा पुढे सांगताना शत्रुघ्न म्हणाले, “तू तुझ्या भावाला पाहिलंस का? तो बिहारी, गल्लीतला गुंड आणि आमची मुलगी अत्यंत सभ्य, इतकी सुंदर आणि मिस इंडिया.. असं त्या माझ्या भावाला म्हणाल्या होत्या. तुम्ही जर त्या दोघांना एकत्र उभं केलंत तर पांढरी आणि काळ्याची जोडी वाटेल, अशा शब्दांत त्यांनी नकार दिला होता.” हा किस्सा ऐकून सर्वजण हसू लागतात.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नाला कुटुंबीयांचा आणि विशेषकरून शत्रुघ्न सिन्हा यांचा विरोध होता, अशी जोरदार चर्चा होती. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी वेळोवेळी या चर्चा फेटाळल्या होत्या. आता कपिल शर्माच्या शोमध्ये जावयासोबत एकत्र येऊन त्यांनी मतभेदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी या एपिसोडमध्ये त्यांचा गाजलेला “खामोश” हा डायलॉगही म्हणून दाखवला. यासोबतच त्यांनी अभिनेते धर्मेंद्र यांनी दिलेला एक मजेशीर सल्ला सांगितला. “धर्मेंद्र यांनी मला एकदा सांगितलं होतं की, हे बघ.. तू या फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहेत. तुझ्यासाठी अनेक मुली वेड्या आहेत. तू नेहमी एका वेळी ‘वन-वुमन मॅन’ (एकाच मुलीसोबत) राहा”, असा किस्सा शत्रुघ्न यांनी सांगितला. त्यावर लगेच त्यांचा जावई झहीर म्हणता, “मला वाटलं हा कौटुंबिक एपिसोड असेल. काय चाललंय?”

'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.