Sheezan Khan : तुनिषा शर्मा प्रकरणातील आरोपी शीजान खानला न्यायालयाकडून मिळाली ‘ही’ परवानगी
तुनिषा शर्मा प्रकरणातील आरोपी शिझान खान याचा जामीन मुंजूर झाल्यानंतर न्यायालयाकडून अभिनेत्याला मिळाली 'ही' परवानगी, सध्या सर्वत्र शिझान खान याची चर्चा...
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या हत्येप्रकरणी अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान (Sheezan Khan) वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तुनिषा हिच्या निधनानंतर अभिनेत्रीच्या आईने लेकीचा एक्स बॉयफ्रेंड शिझान खान याच्यावर गंभीर आरोप केले. अभिनेत्रीच्या आईने गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्याला पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली. पण मार्च महिन्यात शिझान याला नियमानुसार जामीन मंजूर झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्याने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सध्या सर्वत्र शिझान याची चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र शिझान खान याची चर्चा रंगत आहे.
जामीन मंजूर झाल्यानंतर अभिनेत्याने न्यायालयाकडे परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. शीजनचा हा अर्ज मुंबईच्या वसई न्यायालयाने मंजूर केला आहे. शीजनला परदेशात जाण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. त्याचवेळी न्यायालयाने प्राधिकरणाला अभिनेत्याचे पासपोर्ट परत करण्यास सांगितले आहे.
तुनिषा हिच्या निधनानंतर अभिनेत्याला ‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता अभिनेता नव्या शोसाठी सज्ज झाला आहे. अभिनेता लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या ‘खतरो के खिलाखी’ शोच्या १३ व्या सीझनमध्ये दिसणार आहे. ‘खतरो के खिलाखी’ शोचं शुटिंग परदेशात सुरु आहे. त्यामुळे अभिनेत्याने न्यायालयाकडे परदेशात जाण्याची परवानगी मागितली असल्याची चर्चा रंगत आहे.
शीजान खान याने वकील शैलेंद्र मिश्रा आणि शरद राय यांच्यामार्फत न्यायालयात पासपोर्ट तात्पुरता परत करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तुनिषा शर्मा प्रकरणात शीजनचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जामिनावर असलेल्या आरोपीला काम करण्याची मुभा दिली जाते… असं अभिनेत्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितल्यानंतर न्यायालयाने अभिनेत्याचा अर्ज मंजूर केला आहे.
तुनिषा शर्मा प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर अभिनेत्याला जवळपास अडीच महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. 2 फेब्रुवारी रोजी वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांच्या समोर झालेल्या युक्तिवादनंतर न्यायालयाने 4 मार्च रोजी निकाल दिला आहे.
‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तनुषी शर्मा हिने स्वतः आयुष्य संपवल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. तुनिषा हिने शिझान खान याच्या मेकअप रुममध्ये अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनानंतर अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला.
तुनिशाचं बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.