Tunisha Sharma case : ‘तू या माणसासाठी स्वतःला संपवलं…’, शिझान खानचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी संतापले

तुनीषा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खान याचा जामीन मंजूर झाल्यानंतरल अभिनेता जगतोय आनंदी आयुष्य; आता व्हायरल होत असलेला फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल..

Tunisha Sharma case : 'तू या माणसासाठी स्वतःला संपवलं...', शिझान खानचा 'तो' फोटो पाहून नेटकरी संतापले
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 5:17 PM

Tunisha Sharma case : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान (Sheezan Khan) वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण आता तुनीषा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खान याचा जामीन मंजूर झाला. ५ मार्च रोजी शिझान याची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून झाली आहे. शिझान गेल्या अडीच महिन्यापासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिझान आनंदी आयुष्य जगत आहे. सध्या शिझान याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये शिझान त्याच्या कुटुंबासोबत दिसत आहे. अडीच महिन्यांनंतर शिझान कुटुंबासोबत आनंदी दिसत आहे. शिझान याची बहिण शफक नाज हिने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर शिझानचा कुटु्ंबासोबत फोटो शेअर केला. सध्या शिझानचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शिझान याची बहीण शफक नाज हिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये,’शांती…’ असं लिहिलं आहे. फोटोमध्ये शिझान याची आई देखील दिसत आहे. काही लोकांनी फोटोला पसंती दर्शवली आहे तर, काही नेटकऱ्यांनी मात्र तिव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र शिझान याच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

फोटो पाहिल्यानंतर अनेक जण शिझान याला ट्रोल करत आहेत. फोटोवर एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘तुनिषा तू या माणसासाठी स्वतःला संपवलं.’ असे अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तुनिषाच्या आत्महत्येवर दुःख तर, शिझान आणि त्याच्या कुटुंबावर संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र शिझानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिझान खान जवळपास ७० दिवस तुरुंगात होता. 2 फेब्रुवारी रोजी वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांच्या समोर झालेल्या युक्तिवादनंतर न्यायालयाने 4 मार्च रोजी निकाल दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे शिझान याला १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे.

अली बाबा: दास्तान ए काबुल’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. तुनिषा हिने शिझान खान याच्या मेकअप रुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला. मुलीच्या आत्महत्येनंतर तुनिषा हिच्या आईने शिझान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

तुनिषा शर्मा हिच्या आईने केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी शिझान याला अटक केली. शिझान याला अटक झाल्यानंतर अभिनेत्याच्या कुटुंबियांनी देखील तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केले. तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिझान याच्या अडचणीत सतत वाढ होत असल्याचं चित्र दिसत होतं. पण आता अभिनेत्याला दिलासा मिळाला आहे.

Non Stop LIVE Update
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा.
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात.
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी.