Shehnaaz Gill: सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाजला अश्रू अनावर; सांगितलं त्याच्याबद्दल का बोलणं टाळते?

सिद्धार्थबद्दल बोलणं का टाळते? कारण सांगताना शहनाजला कोसळलं रडू

Shehnaaz Gill: सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाजला अश्रू अनावर; सांगितलं त्याच्याबद्दल का बोलणं टाळते?
Shehnaaz Gill and Siddharth SuklaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 11:12 AM

मुंबई: ‘पंजाबची कतरिना’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिल हिने नुकताच युट्यूबवर नवीन चॅट शो सुरू केला. या चॅट शोमध्ये आतापर्यंत राजकुमार राव आणि आयुषमान खुराना यांनी हजेरी लावली. यापैकी आयुषमान खुरानाच्या एपिसोडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मुलाखतीत शहनाज पहिल्यांदाच दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दल बोलताना दिसतेय. सिद्धार्थबद्दल बोलताना ती अत्यंत भावूक झाली. त्याच्याबद्दल सार्वजनिकरित्या बोलणं का टाळते, यामागचं कारणही तिने सांगितलं.

सिद्धार्थच्या आठवणीत रडली शहनाज

शहनाजच्या चॅट शोचा हा दुसरा एपिसोड नुकताच युट्यूबवर पोस्ट करण्यात आला. या मुलाखतीत आयुषमान आणि शहनाज हे कलाकारांच्या भावनांबद्दल बोलत असतात. अनेकदा सेलिब्रिटींना त्यांच्या भावनांना कशापद्धतीने लपवावे लागतात, याविषयी ते बोलतात.

हे सुद्धा वाचा

यावेळी बोलताना शहनाज म्हणाली की तिच्या आयुष्यातही अत्यंत भावनिक घटना घडली होती. मात्र याबद्दल ती कोणाशी काहीच बोलत नाही. सर्वकाही मनात लपवून ठेवते. हेच बोलताना शहजानला अश्रू अनावर होतात आणि ती रडू लागते.

याच मुलाखतीदरम्यान आयुषमानसोबत बोलताना शहजाने सांगितलं की ती अनेकदा तिच्या भावनांना लपवते. कारण सोशल मीडियावर ट्रोलिंगचं प्रमाण खूप वाढलं आहे. “सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर मी त्याच्याबद्दल सार्वजनिकरित्या बोलणं टाळते. कारण त्यावरून लोक माझ्याबद्दल समज करून बसतात. काहीजण असंही म्हणतात की मी सिद्धार्थबद्दल फक्त यासाठी बोलतेय कारण मला सहानुभूती हवी आहे”, असं ती म्हणाली.

काही दिवसांपूर्वी शहनाजचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका पुरस्कार सोहळ्यात शहनाजला पुरस्कार प्रदान करून तिचा सन्मान करण्यात आला होता. यावेळी पुरस्कार स्वीकारताना शहनाजने पहिल्यांदाच सिद्धार्थ शुक्लाचं नाव घेत त्याचे आभार मानले होते.

बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ आणि शहनाजची खूप खास मैत्री झाली होती. या दोघांना चाहत्यांनी ‘सिदनाज’ असं नाव दिलं. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.