Shehnaaz Gill हिला लागली लॉटरी, सिद्धार्थ शुक्ला याचं मोठं स्वप्न पूर्ण

प्रेम असावं तर असं... सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत पाहिलेलं स्वप्न अखेर शेहनाज गिल हिने केलं पूर्ण... परदेशातून अभिनत्रीला आले शुभेच्छा पत्र... सध्या सर्वत्र शहनाज गिल हिची चर्चा...

Shehnaaz Gill हिला लागली लॉटरी, सिद्धार्थ शुक्ला याचं मोठं स्वप्न पूर्ण
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 12:01 PM

मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचं नातं प्रत्येकाला माहित आहे. शहनाज हिने ‘बिग बॉस १३’ शोमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करत एक वेगळी ओळख तयार केली. आज अभिनेत्रीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण शहनाज हिने मोठ्या धैर्याने सर्व संकटांवर मात केलं. बिग बॉसच्या घरात पंजाबची कतरिना म्हणून ओळख मिळवलेली शहनाज आज नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध आहे. आज शहनाजच्या ग्लॅमरस आणि हॉट अदांवर चाहते फिदा होतात. एवढंच नाही तर, अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने प्रेक्षकाचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

सध्या शहनाज यशाच्या शिखरावर चढत असून अभिनेत्री यशाचा आनंद घेत आहे. शहनाजला मोठ्या पडद्यावर पाहिल्यानंतर चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. आता शहनाज हिच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे. शहनाज हिने मुंबई याठिकाणी स्वतःचं घर घेतलं आहे. मायानगरी मुंबईमध्ये स्वतःचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मुंबई याठिकाणी घर असावं असं सिद्धार्थचं देखील स्वप्न होतं. सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत पाहिलेलं स्वप्न अखेर शेहनाज गिल हिने पूर्ण केलं आहे.

शहनाज हिने स्वतःचं नवीन घर घेतल्यामुळे चाहते तिचं कौतुक करत आहेत. परदेशातून देखील अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शहनाज गिल हिन इन्स्टाग्रान स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये अभिनेत्रीने परदेशातून आलेल्या शुभेच्छा पत्रांचे फोटो शेअर केले आहेत. सध्या सर्वत्र शहनाज गिल आणि तिने मिळवलेल्या यशाची चर्चा रंगत आहे.

शहनाज हिने तिच्या करियरची सुरुवात २०१७ पासून केली. शहनाजने ‘सत श्री अकाल इंग्लंड’ या पंजाबी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर शहनाजने कधीही मागे वळून पाहिलं नाही. शहनाज एक उत्तम गायक देखील आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःची नवी ओळख तयार करत आहे.

शहनाज हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत शहनाज रिलेशनशिपमध्ये होती. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये तुफान रंगल्या. शिवाय चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘बिग बॉस’च्या घरात देखील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. पण सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.