Shehnaaz Gill | शहनाज गिलच्या जनरल नॉलेजची उडवली जातेय खिल्ली; पहा नेमकं काय झालं?
बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या नॉलेजची खिल्ली उडवली आहे.
मुंबई : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. शहनाजचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तिच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या सेटवरील आहे. शहनाज लवकरच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शहनाजसोबत तिचे दोन सहकलाकार राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगमसुद्धा पहायला मिळत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत असून अनेकजण शहनाजच्या ‘जनरल नॉलेज’ची खिल्ली उडवत आहेत.
राघव आणि सिद्धार्थसोबत मिळून शहनाज एक गेम खेळत असते. सिद्धार्थ तिला विचारतो की, असा कोणता गेट आहे ज्यामध्ये तुम्ही प्रवेश करू शकत नाही? त्यावर शहनाज काही उत्तर देण्याआधीच राघव म्हणतो, “कोलगेट”. त्यानंतर शहनाजसुद्धा तेच उत्तर देते. सिद्धार्थ दुसरा प्रश्न शहनाजला विचारतो, “अशी कोणती सिटी (शहर) आहे जिझे तुम्ही जाऊ शकत नाही?” त्यावर संभ्रमात असलेली शहनाज हैदराबादचं नाव घेते. मग लगेच उत्तर बदलत ती सिटाफेल असं म्हणते. त्यावर सिद्धार्थ संभ्रमात पडले. सिद्धार्थने विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर दुसरी एक व्यक्ती देते. तेव्हा शहनाज उत्तर देत म्हणते ‘इलेक्ट्रिसिटी’. हे उत्तर ऐकून सर्वजण हसू लागतात.
View this post on Instagram