Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehnaaz Gill ‘या’ श्रीमंत व्यक्तीला करतेय डेट! दोघांची केमिस्ट्री पाहून तुम्हीही म्हणाल…

Shehnaaz Gill | सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर शहनाज गिल हिच्या आयुष्यात 'या' श्रीमंत व्यक्तीची एन्ट्री! दोघांची केमिस्ट्री पाहून तुम्हीही म्हणाल...., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शहनाज गिल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे... कोण आहे 'तो' ज्याच्यासोबत शहनाज दिसते आनंदी?

Shehnaaz Gill 'या' श्रीमंत व्यक्तीला करतेय डेट! दोघांची केमिस्ट्री पाहून तुम्हीही म्हणाल...
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 8:56 PM

मुंबई | 04 ऑक्टोबर 2023 : ‘क्या करूं मैं मर जाऊं, त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता।’ , ‘तू सिर्फ मेरा है, और मेरा ही रहेगा..’ अशा अनेक डायलॉगमुळे अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) प्रसिद्धी झोतात आली. ‘बिग बॉस’मधून बाहेर निघाल्यानंतर अभिनेत्री सोशल मीडिया आणि दिवंगत अभिनेता सिद्धर्थ शुक्ला याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली. ‘बिग बॉस’मध्ये दोघांचं प्रेम बहरलं. दोघांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण सिद्धार्थ याच्या निधनानंतर चाहत्यांसह शेहनाज हिला देखील मोठा धक्का बसला. सिद्धार्थ याच्या निधनानंतर अनेक दिवस शहनाज सोशल मीडिया आणि माध्यमांपासून दूर होती. पण आता शहनाज हिने स्वतःला सावरलं आहे…

अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून शहनाज हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता शहनाज ‘थँक्यू फॉर कमिंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाची सुरु आहे. दरम्यान, अभिनेत्रीचं खासगी आयुष्य देखील तुफान चर्चेत आलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘थँक्यू फॉर कमिंग’ सिनेमाचं स्क्रिनींग नुकताच पार पडला. तेव्हा शहनाज बॉलिवूडच्या श्रीमंत गायकासोबत दिसली. शहनाज हिच्यासोबत सिनेमाच्या स्क्रिनींगसाठी येणारा गायक दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा आहे. सिनेमाच्या स्क्रिनींगसाठी गुरु, शहनाज हिला सपोर्ट करण्यासाठी पोहोचला.

सांगायचं झालं तर, याआधी देखील अनेकदा गुरु आणि शहनाज यांना स्पॉट करण्यात आलं. दोघांची केमिस्ट्री देखील अनेकांना आवडते. सध्या सोशल मीडियावर दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सिद्धार्थनंतर शहनाज गुरु रंधावा याच्यासोबत आनंदी दिसत आहे….’ पण यावर गुरु रंधावा आणि शहनाज यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

शहनाज गिल हिचा आगामी सिनेमा

अभिनेत्री लवकरच ‘थँक्यू फॉर कमिंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शहनाज हिच्यासोबत भूमी पेडणेकर, कुशा कपिला आणि डॉली सिंह महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन करण भूलानी यांनी केलं आहे. तर शोभा कपूर, अनिल कपूर, एकता कपूर आणि रिया कपूर यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

शहनाज गिल कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील शहनाज कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शेहनाज कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.