मुंबई : बिग बॉसच्या आताच्या सोळाव्या सिझनप्रमाणेच सिझन 13 सुद्धा खूप गाजला होता. या सिझनमधील जवळपास सर्व स्पर्धक प्रकाशझोतात आले होते. यापैकी सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल आणि असिम रियाज यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. सिद्धार्थ या शोचा विजेता ठरला होता, असिम फर्स्ट रनर अप आणि शहनाज तिसऱ्या क्रमांकावर होती. सिद्धार्थ आता या जगात नाही. त्याच्या निधनानंतर जवळपास तीन वर्षांनी असिम रियाजने धक्कादायक खुलासे केले. असिमने बिग बॉसच्या निर्मात्यांवरही गंभीर आरोप केले. असिमच्या याच आरोपांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. सिद्धार्थ, शहनाज आणि असिमचे चाहते आपापसांत भिडले आहेत. यादरम्यान शहनाजचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर शहनाजवर ‘फेक फेमिनिस्म’चा (बनावट स्त्रीवाद) आरोप केला जातोय.
हा व्हिडीओ शेअर करत युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘फेक फेमिनिस्मचं उदाहरण आहे शहनाज गिल. एक महिलाच दुसऱ्या महिलेची शत्रू असते, हे खरंय. ही फेकनाज महिलांच्या सशक्तीकरणावर ज्ञान देणार का? असिमने तिच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश केला.’
या व्हिडीओमध्ये तीन फुटेज एकत्र दाखवण्यात आले आहेत. त्यापैकी एक बिग बॉस 13 मधील, दुसरा ब्रह्मकुमारीच्या एका कार्यक्रमातील आणि तिसरा शहनाजच्या शोचा आहे. ब्रह्मकुमारीच्या कार्यक्रमात शहनाज म्हणतेय की तिच्या आत्या, मावशी या सशक्त महिला होत्या. त्यांनीच तिला शक्तीशाली बनवलं. यानंतर शहनाजचा बिग बॉस 13 मधील क्लिप दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओत ती म्हणतेय, “मर्द बन, लडकी नही. इतरांच्या बोलण्यात अडकण्याचं काम मुलींचं असतं.” यानंतर ब्रह्मकुमारीच्या क्लिपमध्ये शहनाज म्हणते, “मी स्वत: एक मुलगी आहे. मुलींचं खच्चीकरण करू नका. मुलीने मुलांसारखं असलं पाहिजे असं म्हणतात. पण आम्हाला मुलगा बोलून आमचं अपमान का करताय? आम्ही मुली आहोत, तुम्ही आम्हाला हा कमजोर बनवत आहात.”
Example of Fake Feminism ~ @ishehnaaz_gill
Aurat hi Aurat ki dushman hoti hai, kisi ne sach kaha h….
Yeh Fakenaaz Women empowerment pe gyan degi ?!ASIM’S IV EXPOSED HYPOCRITES#AsimRiaz #AsimSquad pic.twitter.com/BEe4fJ2gE3
— Real Adi ? (@adhvikslays783) February 26, 2023
तिसऱ्या क्लिपमध्ये शहनाज तिच्या शोमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबत पहायला मिळतेय. यामध्ये ती सांगते की मुलांसोबत ती जास्त कम्फर्टेबल असते. “शाळा आणि कॉलेजमध्ये माझी सर्वाधिक मैत्री मुलांशीच व्हायची. मी मुलींसोबत फार राहिले नाही. मुलांची मुलींसोबत चांगली मैत्री होते”, असं ती म्हणताना दिसतेय.
शहनाज तिच्या या तीन वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये वेगवेगळं बोलताना दिसतेय. एकीकडे ती महिलांच्या सशक्तीकरणाबद्दल बोलतेय. तर दुसरीकडे तीच मुलींना म्हणतेय की ‘मर्द बन, लडकी नहीं’. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी शहनाजवर दुटप्पीपणाची टीका करत आहेत.