Salman Khan याने सेटवर खरंच मुलींच्या ड्रेसिंग स्टाइलवर घातली बंदी? शहनाजचं मोठं वक्तव्य

शुटिंगच्या सेटवर सलमान खान याने मुलींच्या 'अशा' कपड्यांवर घातली होती बंदी? शहनाज गिल याच्या वक्तव्यानंतर सर्व सत्य समोर, सध्या सर्वत्र पलक आणि शहनाज यांची चर्चा

Salman Khan याने सेटवर खरंच मुलींच्या ड्रेसिंग स्टाइलवर घातली बंदी? शहनाजचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 2:13 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शहनाज गिल सध्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून शहनाज मोठ्या पडद्याावर पदार्पण करणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक चर्चा रंगत आहेत. सिनेमात सलमान खान याने अनेक उभरत्या कलाकारांना संधी दिली आहे. अभिनेत्री पलक तिवारी देखील सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी पलकने सलमान खान आणि सेटवर उपस्थित मुलींच्या कपड्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. सेटवर मुलींना मोठ्या गळ्याचे कपडे घालण्यास बंदी होती… असं वक्तव्य पलक हिने केलं. आता यावर शहनाज हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र शहनाज हिची चर्चा रंगत आहे.

एका पत्रकार परिषदेत शहनाज हिला सलमान खान याने सेटवर बनवलेल्या नियमांबद्दल विचारलं. तेव्हा शहनाजने सेटवर कोणतेही नियम नसल्याचं सांगितलं आहे. स्वतःचं उदाहरण देत शहनाज म्हणाली, ट्रेलर लॉन्चला मी स्वतः हॉट ड्रेस घालून आली होती. ‘सेटवर कोणतेही नियम नव्हते..’ असं देखील शहनाज म्हणाली. सध्या शहनाजचं वक्तव्य चर्चेत आहे.

पलक तिवारीने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘मुलींनी मोठ्या गळ्याचे कपडे घालणं सलमान खानला आवडत नाही. सेटवर कोणत्याही मुलीची नेकलाइन योग्य असावी असा सलमान खानचा नियम आहे… असं पलक म्हणाली होती. पलकने सलमान खानबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर प्रचंड खळबळ माजली. त्यानंतर पलकने स्वतःची बाजू सावरत भूमिका मांडली आहे.

हे सुद्धा वाचा

पलक म्हणाली, ‘मी केलेलं वक्तव्य इतरांपुढे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं. सिनियर्सच्या समोर कसे कपडे घालायला हवेत यासाठी मी काही गाइडलाइन्स तयार केल्या आहेत…’ असं पलक म्हणाली. सध्या सर्वत्र पलक आणि शहनाज यांच्या वक्तव्यांची चर्चा रंगत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) सिनेमा २१ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

पलक लवकरच अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी का जान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याआधी पलक गायक हार्डी संधू याच्या ‘बिजली’ या गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी पलक तिवारी प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास यशस्वी होते की नाही… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.