Shehnaaz Gill | ‘…त्यापेक्षा मी मरण पत्करेल’, शहनाज गिल हिच्या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ

Shehnaaz Gill | बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखररावर असताना शहनाज गिल धक्कादायक वक्तव्य, चाहते चिंतेत... शहनाज गिल कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण सध्या शहनाज गिल हिने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा... असं का म्हणाली शहनाज?

Shehnaaz Gill | '...त्यापेक्षा मी मरण पत्करेल', शहनाज गिल हिच्या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 11:42 AM

मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ‘बिग बॉस १३’ मध्ये देखली आपल्या खोडकर स्वभावाने शहनाज गिल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर आजही शहनाज हिचे बिग बॉसमधील व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता शहनाज हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत शहनाज आता स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. अभिनेता सलमान खान याच्यासोबत ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात झळकल्यानंतर शहनाज ‘थैंक्यू फॉर कमिंग’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या शहनाज सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ६ ऑक्टोबर रोजी सिनेमो मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

दरम्यान, शहनाज तिच्या धक्कादायक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी शहनाज हिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम आणि टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला फिट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ‘मी आज बॉलिवूडमध्ये काम करत नसती तर, जाड शहनाज गिल असती. पण बॉलिवूडमध्ये रहायचं असेल, तर स्वतःला फिट ठेवावं लागतं…’

‘नुकताच मला एकाने जुन्हा शहनाज गिल हिच्या भूमिकेसाठी ऑफर दिली होती. तेव्हा मी त्यांच्यासमोर हात जोडले आणि जमणार नाही म्हणून सांगितलं. मी त्यांना सांगितलं, तुम्ही माझ्याकडून काहीही करुन घ्या, पण मी पुन्हा जाड होणार आहे. स्वतःला मोठ्या मेहनतीने फिट केलं आहे. आता माझ्याकडून पुन्हा असं होणार नाही…’

पुढे शहनाज म्हणाली, ‘मला पूर्वीची शहनाज गिल प्रचंड आवडते. जे इंडस्ट्रीमध्ये नाहीत, ते आनंदी जीवन जगत आहेत. कारण अशा आयुष्याचा काय फायदा जेथे आपल्याला आपल्या आवडीचे पदार्थ खायला मिळत नाहीत… त्यापेक्षा मी मरणं पत्करेल. जाड – बारीक असं काहीही नसतं. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा…’ असं देखील शेहनाज म्हणाली…

शहनाज गिल हिचा आगामी सिनेमा

अभिनेत्री लवकरच ‘थँक्यू फॉर कमिंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शहनाज हिच्यासोबत भूमी पेडणेकर, कुशा कपिला आणि डॉली सिंह महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन करण भूलानी यांनी केलं आहे. तर शोभा कपूर, अनिल कपूर, एकता कपूर आणि रिया कपूर यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

शहनाज गिल कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील शहनाज कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शेहनाज कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.