‘राजकीय आणि वादग्रस्त भूमिकेवर…. ‘, जेव्हा हातात बेड्या घालून प्रसिद्ध अभिनेत्याने स्वीकारला पुरस्कार
सर्वांसमोर हातात बेड्या घालून आला अभिनेता ... धक्कादायक कारण समोर... सध्या सर्वत्र प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा...

मुंबई | बॉलिवूडच्या अनेक गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात. शिवाय सेलिब्रिटी खुद्द त्यांच्या खासगी आयु्ष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. आता देखील बॉलिवूडमधील एक रहस्य समोर येत आहे. एकदा प्रसिद्ध अभिनेता चक्क हातात बेड्या घालून पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आला होता. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. पुरस्कार स्वीकारण्यासाठी हातात बेड्या घालून येणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते शेखर कपूर (Shekhar Kapur) आहे. शेखर कपूर फक्त अभिनेतेच नाही तर प्रसिद्ध दिग्दर्शक देखील आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून चर्चेत असलेल्या शेखर कपूर यांनी ‘बॅन्डिट क्वीन’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं.
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. फुलन देवी यांच्या जीवनावर आधारित ‘बॅन्डिट क्वीन’ सिनेमा तेव्हा तुफान चर्चेत आला होता. एवढंच नाही तर, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा फिल्मफेअर पुरस्कार देखील सिनेमाला मिळाला होता. पण पुस्कार स्वीकारण्यासाठी शेखर कपूर हातात बेड्या घालून स्टेजवर पोहोचले. फुलन देवी यांच्या जीवनावर आधारित ‘बॅन्डिट क्वीन’ वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला होता.
वादा इतका टोकाला गेला होती की, फुलन देवी यांच्या जीवनावर आधारित ‘बॅन्डिट क्वीन’ सिनेमा अनेक ठिकाणी बॅन देखील करण्यात आला. सिनेमात काही असे सीन होते, जे मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी योग्य नव्हते. सिनेमाला अनेक स्तरातून विरोध झाला. पण बॉक्स ऑफिसवर मात्र सिनेमाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आता सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित होतोय
अशात शेखर कपूर यांनी सिनेमासंबंधीत एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. शेखर कपूर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये शेखर कपूर यांच्या हातात बेड्या दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे, पुरस्कार सोहळ्यात शेखर कपूर हातात बेड्या घालून आले होते. एवढंच नाही तर शेखर कपूर यांनी हातात असलेल्या बेड्यांमागचं कारण देखील सांगितलं आहे.
शेखर कपूर म्हणाले, ‘फिल्मफेअरने मला बन्डिट क्वीनच्या पुरस्कारासाठी राजकीय किंवा वादग्रस्त वक्तव्य करू नये असं सांगितले होतं. पुरस्कार सोहळा नॅशनल टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. पण सिनेमाला बॅन करण्यात आलं होतं. असं असताना मी वचन पाळलं.. एक शब्द देखील बोललो नाही.. म्हणून मी अशा पद्धतीत स्टोजवर गेलो…’ सध्या सर्वत्र शेखर कपूर यांची पोस्ट व्हायरल होत आहे..