Raju Srivastav : शेखर सुमन राजू श्रीवास्तव 15 दिवसांपूर्वी भेटले होते , तब्येतीची काळजी घेण्याचा दिला होता सल्ला
शेखर सुमनने सांगितले की ते दोघे दोन आठवड्यांपूर्वी इंडियाज लाफ्टर चॅम्पियन शोच्या सेटवर भेटले होते. शेखर सुमन यांनी राजूची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई : अवघ्या देशाला आपल्या कॉमेडीच्या (Comedy)अनोख्या शैलीने हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना जिममध्ये व्यायाम करताना राजूला हृदयविकाराचा झटका आला. तेव्हापासून ते रुग्णालयात (Hospital) आहेत. त्यांच्या चाहत्यांनी त्यांची तब्येत बरी व्हावी प्रार्थना देखील सुरु केली आहे. राजू श्रीवास्तव तब्येतीत थोडी सुधारणा आहे. ते उपचारांवर प्रतिक्रिया देत आहेत. पण पूर्ण जाणीव नसल्याची माहिती मिळाली आहे. आता त्यांचे मित्र शेखर सुमन यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीवर प्रतिक्रिया दिली आहे.
शेखरने राजूच्या तब्येतीचे अपडेट दिले
शेखर सुमनने सांगितले की ते दोघे दोन आठवड्यांपूर्वी इंडियाज लाफ्टर चॅम्पियन शोच्या सेटवर भेटले होते. शेखर सुमन यांनी राजूची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दिली आहे. तीन दिवसांपूर्वी त्याने बोट हलवले होते. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मला आशा आहे की राजू लवकर बरा होईल आणि त्याची तब्येत खूप सुधारेल. राजू 15 दिवसांपूर्वी इंडियाज लाफ्टर चॅलेंजच्या सेटवर पोहोचला होता. व्हॅनिटी व्हॅनमध्ये आमची खूप वेळ चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं आहे.
शेखर सुमनने राजू श्रीवास्तवला दिला होता सल्ला
“माझ्या लक्षात आले की तो थोडा अशक्त दिसत होता. मी त्याला सल्ला दिला होता की काही गोष्टी थोड्या हळू घ्या आणि आयुष्यात खूप गोष्टी वाढवू नका. पण मी त्यांना तुमच्या तब्येतीची काळजी घ्या असे सांगितले. त्याला कोणताही आजार नसल्याचे राजूने उत्तरात सांगितले होते. सर्व काही ठीक आहे. 15 दिवसांनंतर आम्हाला धक्कादायक बातमी मिळाली की राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी राजूला गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो. आम्ही फिक्शन शो रिपोर्टरमध्ये एकत्र काम केले. तो एक अद्भुत व्यक्ती आहे. मला वाटतं, संपूर्ण देश राजूसाठी प्रार्थना करत आहे.