पैशांसाठी प्रसिद्ध अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, स्वतःच कबूली देत म्हणाली, ‘तसं काम मी आता…’
Sherlyn Chopra Shocking Confession: 'तसं काम मी आता...', झगमगत्या विश्वात करीयर, प्रसिद्ध, संपत्ती, शारीरिक संबंध आणि... सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर स्वतः कबूली देत अभिनेत्री म्हणाली, 'तसं काम मी आता...', सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा
Sherlyn Chopra Shocking Confession: बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी अनेक तरुण, तरुणी मुंबईत येत असतात. मायानगरीत आल्यानंतर अनेकांटा स्वप्न पूर्ण झालीत, तर अनेकांना संघर्षाचा सामना करावा लागला. अशात अनेकांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला, तर काही मात्र चुकीच्या मार्गाने गेले. असंच काही एका अभिनेत्रीसोबत देखील झालं. अभिनेत्रीने इंडस्ड्रीमध्ये पदार्पण तर केलं. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावली. पण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही. ज्यामुळे अभिनेत्रीने चुकीचा मार्ग अवलंबला.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री शर्लिन चोप्रा आहे. पैशांची गरज असल्यामुळे शर्लिन हिने सर्व मर्यादा ओलांडल्या… घडलेल्या गोष्टींची कबुली खुद्द अभिनेत्रीने दिली होती. आज शर्लिन यशस्वी अभिनेत्री नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.
एकदा ट्विट करत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला होता. ‘अनेकदा मला पेड सेक्ससाठी साईन करण्यात आलं आणि मी देखील पैशांची गरज होती म्हणून केलं. मी किती बिचारी, वाईट किंवा चांगली मुलगी आहे… असं सांगण्यासाठी हे वक्तव्य केलं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, आजही मला यासाठी फोन येतात. ज्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत त्यांना मला सांगायचं आहे, मी आता असं काहीही करत नाही. पूर्वी काय झालं माझ्या आता लक्षात देखील नाही.’ असं अभिनेत्री म्हणाली.
काही लोकांनी शर्लिन चोप्राला सोशल मीडियावर मेसेज केले होते, त्यानंतर अभिनेत्रीने सार्वजनिकरित्या हे वक्तव्य केलं होतं. सांगायचं झालं तर, शर्लिन चोप्रा हिच्याकडे सध्या चांगला प्रोजेक्ट नाही. पण शर्लिन चोप्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या पतीवर देखील शर्लिन हिने गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे देखील अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लगतो.
शर्लिन चोप्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण अनेक पोस्टमुळे अभिनेत्रीवर नेटकऱ्यांकडून निशाणा साधला जातो.. आता अभिनेत्री तिच्या ओठांमुळे चर्चेत आली आहे.