क्रिकेटच्या मैदानावरील गब्बर झाला ‘सिंघम’; IPL 2023 च्या आधी ‘या’ प्रसिद्ध मालिकेत झळकणार शिखर धवन

शिखर धवनने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'आपला धवन आता सिंघम झाला आहे', असं एकाने लिहिलंय. तर 'गॉड गब्बर' असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'सिंघम 2.0' अशीही कमेंट नेटकऱ्याने केली आहे.

क्रिकेटच्या मैदानावरील गब्बर झाला 'सिंघम'; IPL 2023 च्या आधी 'या' प्रसिद्ध मालिकेत झळकणार शिखर धवन
Shikhar DhawanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 3:28 PM

मुंबई : एकीकडे आयपीएल 2023 च्या आधी 10 टीमचे खेळाडू आपापल्या टीमसह प्रशिक्षणात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे पंजाब किंग्स टीमचा कर्णधार शिखर धवन ‘सिंघम’ बनला आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओमध्ये तो दरवाजा तोडून एण्ट्री करतोय आणि पोलीस ठाण्यात आपली धमक दाखवतोय. यामध्ये तो गुंडांची धुलाई करताना आणि त्यांच्याकडून आपल्या हातापायांचीही मालिश करवून घेतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ खुद्द शिखर धवनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘आली रे आली, आता तुझी बारी आली. काहीतरी नवीन घेऊन येतोय’, असं कॅप्शन शिखरने या व्हिडीओला दिलं आहे. पोलिसाच्या गणवेशातील शिखरचा हा व्हिडीओ पाहून चाहते विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. ‘गब्बर आता सिंघम झालाय’ अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’मधील अभिनेत्री अंजुम फकिहने इन्स्टाग्रामवर शिखरसोबत फोटो पोस्ट केला आहे. ‘धवन भी और दबंग भी..’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. त्यामुळे कुंडली भाग्य या मालिकेत शिखर धवन हा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेतील एका एपिसोडमध्ये शिखर झळकणार आहे. या एपिसोडमध्ये तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

शिखर धवनने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आपला धवन आता सिंघम झाला आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘गॉड गब्बर’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘सिंघम 2.0’ अशीही कमेंट नेटकऱ्याने केली आहे.

कुंडली भाग्य ही छोट्या पडद्यावरील बहुचर्चित मालिका आहे. या मालिकेच्या कथेच नुकताच 20 वर्षांचा लीप दाखवण्यात आला होता. याच मोठ्या बदलासह आता मालिकेत क्रिकेटर शिखर धवनची एण्ट्री होणार आहे. याआधी त्याने सतराम रमाणी दिग्दर्शित ‘डबल एक्सएल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये त्याने सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्यासोबत भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर आता कुंडली भाग्य मालिकेत त्याला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहणं चाहत्यांसाठी खूपच औत्सुक्याचं असेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.