Shilpa Shetty सोबत डेटवर जाण्यासाठी सलमान खानचा खास प्लान; अभिनेत्रीच्या वडिलांचा एक निर्णय आणि…

शिल्पा शेट्टी हिच्या वडिलांमुळे अभिनेत्रीसोबत सलमानची डेट अधुरी... शिल्पाच्या वडिलांना पाहिल्यानंतर भाईजान घाबरला आणि त्यानंतर मात्र... सध्या सर्वत्र सलमान - शिल्पा यांच्या नात्याची चर्चा

Shilpa Shetty सोबत डेटवर जाण्यासाठी सलमान खानचा खास प्लान; अभिनेत्रीच्या वडिलांचा एक निर्णय आणि...
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 1:40 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान (salman khan) याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सलमानच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते कायम सलमान याला एकच प्रश्न विचारतात तो म्हणजे ‘लग्न कधी करणार?’ सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं, पण कोणत्याचं अभिनेत्रीसोबत भाईजानचं नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण आज देखील सलमानच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. सलमान खान याने ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी आणि कतरिना कैफ यांना डेट केलं आहे. पण एकदा सलमान खान याला अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यासोबत देखील डेटवर जायचं होतं. पण अभिनेत्रीच्या वडिलांमुळे दोघांना डेटवर जाणं शक्य झालं नाही.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता एक किस्सा सांगताना दिसत आहे. ‘दस का दम’ शोच्या तिसऱ्या सीरिजमधील हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. शोमध्ये शिल्पा शेट्टी आणि फरहा खान पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तेव्हा अभिनेत्याने डेटिंगचा किस्सा सांगितला होता. (salman khan affairs)

हे सुद्धा वाचा

सलमान खान म्हणाला, ‘आम्ही एकत्र काम करण्यास सुरुवात केली होती आणि अचानक डेटवर जाण्याचा विचार केला. तेव्हा शिल्पा चेंबूरमध्ये राहत होती. मी चेंबूरमध्ये गेलो, तिच्या बिल्डिंग खाली उभा होतो. ती चौथ्या मजल्यावर राहत होती वाटतं.. मी गाडी खाली पार्क केली होती. मी विचार करत होतो शिल्पा अजून येत का नाही…’

‘समोर पाहिलं तर एक उंच माणूस लुंगी लावून उभा होता. तेव्हा शिल्पाने सांगितलं माझे वडील आहेत. तर मी विचारलं कसे आहात म्हणून, तर ते टशनमध्ये म्हणाले ‘फाईन’ म्हणून… शिल्पाच्या वडिलांनी मला सांगितलं १२ वाजे पर्यंत घरी ये…. मी म्हणालो आता तर ११.३० वाजले आहेत… मी पाहिलं त्यांच्या हातात ग्लास होता. त्यांनी मला इशाऱ्याने विचारलं आणि मला घरी बोलावलं…’

पुढे सलमान खान म्हणाला, ‘मी गेलो शिल्पाच्या घरी. आम्ही गप्पा मरायला सुरुवात केली. शिल्पा आमच्यासोबत १५ मिनिटं बसली आणि जावून झोपली. मी तिच्या घरातून पहाटे ५.३० वाजता निघालो…’ सलमान याने सांगितलेला किस्सा ऐकून फरहा खान देखील पोट धरुन हसू लागली.

शिल्पा आणि सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. ‘औजार’, ‘शादी करके फंस गया यार’, ‘गर्व: प्राइड एन्ड ऑनर’ आणि ‘फिर मिलेंगे’ सिनेमात दोघांनी एकत्र चाहत्यांचं मनोरंज केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.