‘हँगरसोबतच ड्रेस घातला की काय?’, शिल्पा शेट्टीच्या विचित्र ड्रेसवर भन्नाट कमेंट्स

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधलं. शिल्पाने या कार्यक्रमात काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. मात्र कमरेजवळ लावलेला प्लास्टिक पाहून नेटकरी चकीत झाले.

'हँगरसोबतच ड्रेस घातला की काय?', शिल्पा शेट्टीच्या विचित्र ड्रेसवर भन्नाट कमेंट्स
Shilpa ShettyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 1:03 PM

मुंबई : 19 मार्च 2024 | सोमवारी मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात बॉलिवूडमधल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या लूकने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं. शिल्पाने या कार्यक्रमात काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. मात्र या ड्रेसमधील एका विचित्र गोष्टीमुळे शिल्पाला चांगलंच ट्रोल केलं जातंय. शिल्पाने या ड्रेससोबत कमरेला ‘ऑक्सिजन मास्क’सारखी प्लास्टिकची विचित्र गोष्ट लावली होती. त्यामुळे तिच्या फॅशन सेन्सची तुलना उर्फी जावेदशीही होऊ लागली आहे.

शिल्पाने साइड कट बॉडी हगिंग ड्रेस परिधान केला होता. यावेळी ती पापाराझींसमोर बिनधानस्तपणे फोटोसाठी पोझ देत होती. पापाराझींनी तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘कमरेला प्लास्टिक का लावलाय’, असा सवाल एकाने केला. तर ‘ही उर्फी जावेदचीच बहीण आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘शिल्पाने कमरेला प्लास्टिक ऑक्सिजन मास्क लावला की काय’, अशी उपरोधिक कमेंटने नेटकऱ्यांनी केली. इतकंच नव्हे तर राज कुंद्राच्या चेहऱ्याचा मास्क शिल्पाने चुकीच्या ठिकाणी लावला, अशीही खिल्ली काही युजर्सनी उडवली आहे. ‘एक्स्ट्रा किडणी सोबत घेऊन फिरतेय’, अशीही भन्नाट कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

हे सुद्धा वाचा

शिल्पा शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. राज कुंद्राशी तिने पैशांसाठी लग्न केल्याच्या कमेंट्सवर बोलताना शिल्पा म्हणाली, “जेव्हा मी राजशी लग्न केलं, तेव्हा गुगलने दिलेल्या माहितीनुसार, तो सर्वांत तरुण आणि सर्वांत श्रीमंत ब्रिटिश भारतीयांच्या यादीत 108 व्या स्थानी होता. मात्र लोक शिल्पा शेट्टीबद्दल गुगल करायला विसरतात. मी तेव्हासुद्धा श्रीमंत होते आणि आताही अधिक श्रीमंत आहे. मी माझे सर्व इनकम टॅक्स, जीएसटी आणि इतर बिलं भरते. तसंही त्याच्यापेक्षाही इतर श्रीमंत लोक त्यावेळी मला लग्नासाठी मागणी घालत होते. पण पैसा हा माझ्या आयुष्यात कधीही निर्णायक घटक ठरला नाही.”

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.