शिल्पा शेट्टी हिच्याकडून मोठा गौप्यस्फोट, राज कुंद्रासोबत लग्न करायचंच नव्हतं; का घेतला निर्णय? काय घडलं तेव्हा?

Shilpa Shetty - Raj Kundra | शिल्पा शेट्टी हिला इच्छा नसताना उचलावं लागलं मोठं पाऊल, शिल्पा हिने का केलं राज कुंद्रा याच्यासोबत लग्न? अभिनेत्रीकडून मोठा गौप्यस्फोट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या नात्याची चर्चा...

शिल्पा शेट्टी हिच्याकडून मोठा गौप्यस्फोट, राज कुंद्रासोबत लग्न करायचंच नव्हतं; का घेतला निर्णय? काय घडलं तेव्हा?
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 1:42 PM

मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योजक राज कुंद्रा यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत. शिल्पा शेट्टी राज कुंद्रा यांची दुसरी पत्नी आहे. 2009 मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी लग्न केलं. शिल्पा आज तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची जोडी देखील चाहत्यांना प्रचंड आवडते. पण इच्छा नसताना देखील आभिनेत्रीने राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं. खुद्द शिल्पा हिने तिच्या वैवाहित आयुष्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राज कुंद्रा आणि शिल्पा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

एका मुलाखतीत शिल्पा हिला तिच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. ‘तुमच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाल्यानंतर तुम्ही लग्न केलं का?’ असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही दोघांनी कधीच कसला विचार केला नाही. राज पहिल्या नजरेत माझ्या प्रेमात पडला होता..’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी बिग ब्रदर शोमधून बाहेर आली होती. युकेमध्ये माझ्यासाठी फार क्रेझ होती. राज याच्या मनात देखील माझ्यासाठी इतरांप्रमाणे भावना होत्या. त्याला भारतीय असण्यावर गर्व होता. पण तो पदरेशात राहात होता.’

शिल्पा हिला का करायचं नव्हतं लग्न

मुलाखतीत शिल्पा म्हणाली, ‘मला कधीच राज कुंद्रा याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, पण त्याच्या आई – वडिलांचा आमच्या लिव्ह इन रिलेशनशिपला नकार होता. म्हणून इच्छा नसताना राज याच्यासोबत लग्न करावं लागलं…’ असं अभिनेत्री म्हणाली.

‘लग्नाआधी आमच्या फोनवर गप्पा व्हायच्या. म्हणून फोन बिलची रक्कम देखील दिवसागणिक वाढत होती. त्या किंमतीत आम्ही घर खरेदी केलं असतं…’ असं देखील शिल्पा शेट्टी मुलाखतीत म्हणाली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.

सांगायचं झालं तर, राज कुंद्रा यांच्यासोबत लग्न केल्यानंतर राज कुंद्रा याला अनेक अडचणींचा सामना कराला लागला. पण शिल्पा हिने कधीही राज याची साथ सोडण्याचा निर्णय घेतला नाही. राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केसमध्ये अडकल्यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण शिल्पा तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.