Shilpa Shetty ने पैशांसाठी केलं राज कुंद्रा सोबत लग्न? अभिनेत्रीकडून सत्य अखेर समोर
Shilpa Shetty Marriage: 108 वा सर्वात श्रीमंत ब्रिटिश भारतीय, गडगंज संपत्तीचा मालक... म्हणून राज कुंद्राची दुसरी पत्नी होण्याचा शिल्पा शेट्टीने घेतला निर्णय..., अखेर अभिनेत्रीने सांगितलं सत्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पाच्या खासगी आयुष्याची चर्चा...
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री आज देखील कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायम स्वतःच्या फिटनेसमुळे चर्चेत असणारी शिल्पा एकदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत अली होती. पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर शिल्पाबद्दल देखील अनेक चर्चा रंगू लागल्या. फक्त पैशांसाठी राज याच्यासोबत लग्न केलंय… असं म्हणत अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं.
यावर अभिनेत्रीने मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना सडेतोड उत्तर देखील दिलं. पैशांसाठी राज याच्यासोबत लग्न केलंय.. अशी चर्चा रंगू लागल्यानंतर शिल्पा म्हणाली, ‘तेव्हा राज कुंद्रा 108 वा सर्वात श्रीमंत ब्रिटिश भारतीय होता. पण मी देखील तेव्हा श्रीमंत होती आणि आता देखील आहे. राज याच्याकडे असलेल्या पैशांमुळे मी कधीच त्याच्यासोबत लग्न केलं नाही.’
पुढे शिल्पा म्हणाली, ‘यशस्वी महिला एका अशा पुरुषासोबत लग्न करते जो तिला तिच्या अटींवर आयुष्य जगण्यासाठी मदत करेल.. तो स्वतः चांगल्या विचारांनी सक्षम असेल… याच कारणामुळे मी राज याच्यासोबत लग्न केलं. राजमध्ये सर्व गुण होते, जे मला माझ्या पार्टनरमध्ये हवे होते.’
View this post on Instagram
‘राज याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी मझ्या मागे अनेक श्रीमंत पुरुषांची रांग होती. पण मी कधींच आर्थिक गोष्टींना आयुष्यात स्थान दिलं नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट पैसा नसते.’, असं देखील अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणाली होती. शिल्पा कायम तिच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांना सांगत असते.
शिल्पा – राज यांची लव्हस्टोरी एका सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप लावल्यानंतर देखील दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. आज दोघेही आनंदी आयुष्य जगत आहेत. शिल्पा – राज चाहत्यांना कपल गोल्स देखील देत असतात.
शिल्पा – राज यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव वियान असून 2020 मध्ये त्याचा जन्म झाला. त्यानंतर सरोगेसीच्या माध्यमातून अभिनेत्रीने मुलीला जन्म दिला. शिल्पाच्या मुलीचं नाव समीशा असं आहे. शिल्पा कायम मुलांसोबत फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.