Raj Kundra : ‘आधी माध्यमांनी उघडं केलं, तुरुंगात तर…’, राज कुंद्रा यांचं धक्कादायक वक्तव्य
Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा सध्या 'UT 69' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा ३ नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमा प्रदर्शित होण्यापू्र्वी राज कुंद्रा अनेक मोठे खुलासे करताना दिसत आहे... सध्या सर्वत्र 'UT 69' सिनेमाची चर्चा...

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा लवकरच ‘UT 69’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘UT 69’ सिनेमाच्या माध्यमातून राज बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या राज ‘UT 69’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्यामुळे शिल्पा हिचा पती तुरुंगात घडलेल्या घटनांबद्दल सांगत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राज याने तुरुंगातील दिवसांबद्दल मोठा खुलासा केला. पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात असल्यामुळे राज कुंद्रा याला अपमानित व्हावं लागलं. सर्वांसमोर राज याला स्वतःचे कपडे काढावे लागले… अशा धक्कादायक घटनांचा अभिनेत्रीच्या पतीने खुलासा केला आहे.
राज कुंद्रा म्हणाला, ‘ती वेळ अत्यंत अपमानास्पद होती. कारण तुम्हाला उघडं करतात. कपडे काढून तुमची तपासणी करत. तुमच्याकडे नशेचे पदार्थ आहेत की नाही याची चौकशी पोलीस तुरुंगात करतात. तुमची प्रतिमा मलीन होत आहे… अशी भावना मनात असते. अनेक संकटांचा सामना करत मी या ठिकाणी आलो आहे…’
पुढे राज कुंद्रा म्हणाला, ‘माध्यमांनी तर मला उघडं केलं, तुरुंगात देखील माझी कपडे काढून चौकशी करण्यात आली. म्हणून मी प्रचंड दुःखी आणि निराश होतो…’ सध्या राज कुंद्रा त्याच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा राज कुंद्रा याला अटक करण्यात आली, तेव्हा शिल्पा पतीकडून घटस्फोट घेईल अशी चर्चा रंगली होती.




राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या घटस्फोटाच्या वाऱ्याप्रमाणे सर्वत्र पसरल्या होत्या. शिल्पाने कठीण काळात पतीची साथ सोडली नाही. शिल्पा कायम पतीच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अभिनेत्री पती आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
राज कुंद्रा याचा ‘UT 69’
‘UT 69’ सिनेमा राज कुंद्रा यांच्या तुरुंगातील आयुष्यावर आधारित आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा ३ नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अनेक जण राज कुंद्रा याच्या ‘UT 69’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
शिल्पा आणि राज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, शिल्पा, राज याची दुसरी पत्नी आहे. राज याचं पहिलं लग्न कविता कुंद्रा हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांना एक मुलगी देखील आहे.