शिल्पा शेट्टी हिचा पती आहे 17 वर्षीय मुलीची बाप; अनेक वर्षांपासून नाही पाहिलं लेकीचं तोंड

Shilpa Shetty Husband : लेक 40 दिवसांची असताना राज कुंद्रा याने घेतला पहिल्या पत्नीकडून घटस्फोट... 17 वर्षीय मुलीचा बाप आहे राज कुंद्रा... सध्या सर्वत्र राज कुंद्रा आणि त्याच्या पहिल्या मुलीची चर्चा... घटस्फोटानंतर केलं शिल्पा शेट्टी हिच्यासोबत लग्न...

शिल्पा शेट्टी हिचा पती आहे 17 वर्षीय मुलीची बाप; अनेक वर्षांपासून नाही पाहिलं लेकीचं तोंड
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 1:24 PM

Shilpa Shetty Husband : अभिनेत्री शिल्पा शेट्टी उद्योजक राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्रा आज दुसरी पत्नी शिल्पा हिच्यासोबत आनंदी आहे. पण पहिल्या लग्नामुळे राज कुंद्रा आजही चर्चेत असतो. राज कुंद्रा यांचं पहिलं लग्न 2003 मध्ये झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. 2005 मध्ये राज कुंद्रा याने जगात लेकीचं स्वागत केलं आणि 2006 मध्ये राज कुंद्रा आणि कविता यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर राज कुंद्रा याने लेकीचा चेहरा देखील पाहिला नाही… असं अनेकदा समोर आलं.

पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर 2009 मध्ये राज कुंद्रा याने शिल्पा शेट्टी हिच्यासोबत लग्न केलं. एका मुलाखतीत राज याच्या पहिल्या पत्नीने शिल्पा हिच्यावर संसार उद्ध्वस्त केल्याचे आरोप लावले होते. पण राज कुंद्रा याने शिल्पावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

‘घटस्फोटा पूर्वी माझा शिल्पा हिच्यासोबत कोणतेही संबंध नव्हते. कविता हिने अनेकदा शिल्पाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलं..’ असं राज कुंद्रा म्हणाला. एवढंच नाही तर कविता हिचे माझ्या बहिणीच्या पतीसोबत प्रेमसंबंध होते… असा धक्कादायक खुलासा देखील राज कुंद्रा यांनी एक मुलाखतीत केला होता.

एवढंच नाही तर, मुलाखतींमध्ये शिल्पा विरोधात बोलण्यासाठी कविता हिने मोठी रक्कम देण्यात आली होती… असं देखील राज कुंद्रा म्हणाला होता. सांगायचं झालं तर, पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर एक खंत कायम राज याच्या मनात राहिली. घटस्फोटानंतर आजपर्यंत राज कुंद्रा याने लेकीला पाहिलेलं नाही.

कविता आणि राज यांचा घटस्फोट झाला तेव्हा, त्यांची मुलगी फक्त 40 दिवसांची होती. आज राज आणि कविता यांची मुलगी 17 वर्षांची झाली आहे. राज कुंद्रा कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

नुकताच, राज कुंद्रा ‘UT 69’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता. सिनेमाच्या माध्यमातून राज कुंद्रा यांने तुरुंगातील त्याच्या अनुभवाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला… सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी राज कुंद्रा याने मास्क लावणं देखील बंद केलं.

राज कुंद्रा याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम मुलगा आणि मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.