राज कुंद्रा पेक्षा श्रीमंत व्यक्तींनी मला…, पैसा, लग्न, रॉयल आयुष्याबद्दल शिल्पा शेट्टीचं मोठं वक्तव्य

अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूडच्या सुंदर आणि श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. पण उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री चर्चेत आली. शिल्पा, राज कुंद्रा यांची दुसरी पत्नी आहे.... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा शेट्टी हिची चर्चा रंगली आहे.

राज कुंद्रा पेक्षा श्रीमंत व्यक्तींनी मला..., पैसा, लग्न, रॉयल आयुष्याबद्दल शिल्पा शेट्टीचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 10:27 AM

मुंबई | 9 मार्च 2024 : अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. फिटनेस आणि सौंदर्यांमुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत आली. आता देखील एका मोठ्या कारणामुळे शिल्पा चर्चेत आली. उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं. फक्त आणि फक्त पैशांसाठी शिल्पाने राजसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला… असं म्हणत अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं. पण अभिनेत्रीला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शिल्पा हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘राजसोबत लग्न केल्यानंतर मला गुगलने 108 क्रमांकावर सर्वांत श्रीमंत ब्रिटीश भारतीयांच्या यादीत सामिल केलं होतं. मला असं वाटलं हे चांगलं आहे. मला वाटलं लोकं शिल्पा शेट्टीला गुगल करणं विसरले असतील. जी सर्वात श्रीमंत महिला होती. मी सध्याच्या घडीला अधिक श्रीमंत आहे.’

‘मी इनकम टॅक्स, जीएसटी आणि इतर सर्व गोष्टींसाठी कर भरते. एक यशस्वी महिला कधीच तिच्या जोडीदारामध्ये पैसा पाहात नाही. मी फक्त पैशांसाठी राजसोबत लग्न केलं नाही. तेव्हा राज याच्यापेक्षा अधिक श्रीमंत व्यक्ती मला आमिष दाखवत होते, पण माझ्या आयुष्यात पैसा सर्वकाही आहे… असं काहीही नव्हतं…’ असं देखील अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणाली.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, 2021 मध्ये राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केसमध्ये अडकला होता. तेव्हा शिल्पा हिला देखील अनेक संकटांचा सामना करावा लागला. पॉर्नोग्राफी केसमध्ये राजचं नाव समोर आल्यानंतर शिल्पा घटस्फोट घेईल अशा चर्चा देखील रंगू लागल्या. पण अभिनेत्रीने कधीही पती राज कुंद्रा याची साथ सोडली नाही. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अभिनेत्री पती आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

राज कुंद्रा याचा ‘UT 69’

‘UT 69’ सिनेमा राज कुंद्रा यांच्या तुरुंगातील आयुष्यावर आधारित आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अनेक जण राज कुंद्रा याच्या ‘UT 69’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. शिल्पा आणि राज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, शिल्पा, राज याची दुसरी पत्नी आहे. राज याचं पहिलं लग्न कविता कुंद्रा हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांना एक मुलगी देखील आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.