‘या’ अभिनेत्रींनी विवाहित सेलिब्रिटींवर केलं प्रेम आणि लग्न; आता जगतायेत रॉयल आयुष्य

विवाहित सेलिब्रिटींच्या दुसऱ्या पत्नी म्हणून आज रॉयल आयुष्य जगत आहेत 'या' प्रसिद्ध अभिनेत्री; एकीचं झालं हृदयद्रावक निधन.. सर्वत्र अभिनेत्रींच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा

'या' अभिनेत्रींनी विवाहित सेलिब्रिटींवर केलं प्रेम आणि लग्न; आता जगतायेत रॉयल आयुष्य
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 4:01 PM

मुंबई | 16 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं नाव अनेक अविवाहित सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अनेकदा ब्रेकअपचा सामना केल्यानंतर देखील अभिनेत्रींच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्रीतर झाली, पण विवाहित सेलिब्रिटींसोबत त्यांचं नाव जोडण्यात आलं. अनेक वर्ष विवाहित पुरुषाला डेट केल्यानंतर  बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींनी लग्नाचा विचार केला. विवाहित सेलिब्रिटींच्या प्रेमात पडून अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांना दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला. आज याच अभिनेत्री पती आणि मुलांसोबत आनंदी आणि रॉयल आयुष्य जगत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रींची चर्चा रंगत आहे.

हेमा मालिनी – धर्मेंद्र | दोघांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. धर्मेंद्र यांनी सर्व मर्यादा ओलांडून अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. आज धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणून हेमा मालिनी जगत आहेत.

रवीना टंडन – अनिल थडानी | रवीनाने देखील विवाहित सेलिब्रिटीसोबत लग्न केलं आहे. जेव्हा रवीना – अनिल यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगत होत्या, तेव्हा अनिल थडानी विवाहित होते. महत्त्वाचं म्हणजे रवीना हिच्यासोबत लग्न करण्यासाठी अनिल यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. आज पती अनिल थडानी यांच्यासोबत रवीना रॉयल आयुष्य जगत आहे.

हे सुद्धा वाचा

शिल्पा शेट्टी – राज कुंद्रा | शिल्पा उद्योजक राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्रा यांच्या पहिल्या पत्नीचं नाव कविता असं आहे. घटस्फोटानंतर कविता आणि राज यांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. पण राज कुंद्रा आता दुसरी पत्नी म्हणजे शिल्पा हिच्यासोबत आनंदी आणि रॉयल आयुष्य जगत आहे. त्यांना दोन मुलं देखील आहेत.

श्रीदेवी – बोनी कपूर | श्रीदेवी आज जिवंत नसल्या तरी, बोनी कपूर यांच्यासोबत असलेली अभिनेत्रीची ‘लव्हस्टोरी’ प्रत्येकाला माहिती आहे. श्रीदेवी यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. पण २०१८ मध्ये श्रीदेवी यांच्या हृदयद्रावक निधनाने सर्वत्र खळबळ माजली होती.

सुष्मिता सेन – विक्रम भट्ट | सुष्मिता हिने लग्न केलं नाही. पण अभिनेत्रीचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं आहे. सुष्मिता हिचं नाव विवाहित विक्रम भट्ट यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघाचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.