राज कुंद्रा याच्या समस्यांमध्ये वाढ, अगोदर पाॅर्न प्रकरणात गंभीर आरोप, आता थेट आर्थिक फटका
शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच आता राज कुंद्रा याने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, राज कुंद्रा याच्या या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाहीये.
मुंबई : शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर त्याला थेट पाॅर्न किंग म्हटले गेले. 3 नोव्हेंबर रोजी राज कुंद्रा याचा यूटी 69 हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना राज कुंद्रा याच्यासोबत शिल्पा शेट्टी ही दिसली. मात्र, या चित्रपटाला अजिबात धमाका करता आला नाहीये. हा राज कुंद्रा याला मोठा झटका आहे.
ओपनिंगला चित्रपट धमाका करेल अशी एक चर्चा होती. मात्र, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर दम तोडल्याचे बघायला मिळाले. आता चित्रपटाची एकून आतापर्यंतची कमाई पुढे आलीये. यूटी 69 या चित्रपटाने आतापर्यंत एकून 30 लाखांची कमाई केलीये. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट धमाका करेल, अशी शक्यता फार कमी आहे.
विशेष म्हणजे रिपोर्टनुसार चित्रपटाचे बजेट चांगलेच मोठे आहे. या यूटी 69 चित्रपटामुळे राज कुंद्रा याचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राज कुंद्रा याने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. या चित्रपटात जेलमधील 69 दिवस कसे होते हे आणि त्यादरम्यान त्याच्यासोबत काय घडत होत हे या चित्रपटातून सांगण्यात आले.
राज कुंद्रा याने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, मला काय बोलायचे ते बोला. पण माझ्या मुलांना आणि पत्नीला नका बोलू, कारण त्यांनी तुमचे काहीच बिघडवले नाहीये. हे सर्व बोलताना राज कुंद्रा याच्या डोळ्यात पाणी बघायला मिळाले आणि तो इमोशनल होताना देखील दिसला. राज कुंद्रा याचे नाव पाॅर्न प्रकरणात आल्यापासून तो मास्क वापरताना दिसला.
काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये मुकाबला रंगताना दिसला. थेट राज कुंद्रा हा अगोदर उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर बोलताना दिसला. राज कुंद्रा हा म्हणाला की, पापाराझी यांचे माझ्या कपड्यांवर आणि उर्फी जावेद हिने न घातलेल्या कपड्यांवर लक्ष होते. यानंतर उर्फी जावेद हिने थेट राज कुंद्रा याला पाॅर्न किंग म्हटले होते.