Video | पोर्नोग्राफी प्रकरणावर अखेर राज कुंद्रा याने सोडले माैन, शिल्पा शेट्टी हिच्या पतीकडून मोठा खुलासा
शिल्पा शेट्टी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शिल्पा शेट्टी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा सतत चर्चेत आहे.
मुंबई : शिल्पा शेट्टी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. शिल्पा शेट्टी ही आपल्या फिटनेसवर देखील खूप जास्त लक्ष देते. शिल्पा शेट्टी ही नेहमीच जीम, व्यायाम आणि तिच्या डाएटचे फोटो शेअर करते.
शिल्पा शेट्टी हिने काही दिवसांपूर्वीच अत्यंत मोठा खुलासा केला. शिल्पा शेट्टी हिने थेट म्हटले की, माझा कधीच बाॅलिवूडच्या टाॅप 10 अभिनेत्रीमध्ये समावेश करण्यात आला नाही. मी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले तरीही नाही. पुढे शिल्पा शेट्टी म्हणाली, आता हे बोलणार तरी कोणाकडे ना…आता तसे कोणी नाही देखील. शिल्पा शेट्टी हिचे हे बोलणे ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले.
शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत चर्चेत आहे. शिल्पा शेट्टी हिच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. थेट पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याचे नाव आले. इतकेच नाही तर थेट काही महिने जेलमध्ये राहण्याची वेळ ही राज कुंद्रा याच्यावर आली. मध्यंतरी चर्चा होती की, राज कुंद्रा याला शिल्पा शेट्टी घटस्फोट देणार.
आता नुकताच पहिल्यांदाच राज कुंद्रा हा थेट पोर्नोग्राफी प्रकरणातबद्दल बोलताना दिसला. राज कुंद्रा हा स्टॅंड अप कॉमेडी करताना दिसतोय. याचाच व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. राज कुंद्रा हा स्टॅंड अप कॉमेडीची सुरूवात मास्कमॅन आणि शिल्पा शेट्टी हिचा पती म्हणून करतो. यावेळी काही खुलासे करताना देखील राज कुंद्रा हा दिसतोय.
राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणावर बोलताना थेट म्हणाला की, माझे काम लोकांना कपडे घालणे आहे, काढणे नाही. इतकेच नाही तर राज कुंद्रा थेट म्हणाला की, या दोन वर्षांमध्ये मला पापाराझी यांनी प्रचंड प्रेम दिसले. पापाराझी यांचे फक्त हेच लक्ष की, मी काय कपडे घालतो आणि उर्फी जावेद हिने काय कपडे नाही घातले.