Shiv Thakare करतोय डेजी शाह हिला डेट! नात्याचं सत्य अखेर समोर

Shiv Thakare | शिव ठाकरे आणि डेझी शाह यांच्यातील नात्याचं सत्य अखेर समोर... 'या' व्यक्तीकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र शिव ठाकरे आणि डेझी शाह यांच्या नात्याची चर्चा

Shiv Thakare करतोय डेजी शाह हिला डेट! नात्याचं सत्य अखेर समोर
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 8:51 AM

मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | बिग बॉस फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) गेल्या काही दिवसांपासून कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस’ त्यानंतर “खतरो के खिलाडी” या शोमध्ये शिव ठाकरे याने स्वतःची छाप सोडली. शिव ठाकरे याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील शिव याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. म्हत्त्वाचं म्हणजे लोकप्रिय सेलिब्रिटी असल्यामुळे शिव ठाकरे यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण आता शिव ठाकरे अभिनेत्री डेझी शाह हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शिव ठाकरे याने डेझी शाह हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

मिस्टर फैसू म्हणून प्रसिद्ध असलेल्या फैसल शेखने नुकताच आपला टॉक शो लॉन्च केला आहे. त्याच्या टॉक शोमध्ये शिव ठाकरे याने हजेरी लावली. शोमध्ये शिव ठाकरे याने त्याच्या आयुष्याबद्दल, डेटिंगबद्दल आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आहे.

डेझी शाह हिच्यासोबत असलेल्या नात्यावर शिव ठाकरे म्हणाला…

शोमध्ये फैसल शेख याने शिव ठाकरे याला विचारलं, ‘शिव ठाकरे याची प्रत्येक सकाळ डेझी होत असेल…’ यावर शिव म्हणाला, ‘नाही असं काहीही नाही… माझं डिनो (डिनो जेम्स) याच्यासोबत एक खास बॉन्ड आहे….’ याबद्दल एक उदाहरण सांगत अभिनेता म्हणाला, ‘पण लोकांना आता ब्रदर सिनेमे आवडत नाहीत. ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या सिनेमांना चाहत्यांची पसंती असते.. ‘

‘आताच्या घडीला ब्रदर आणि ‘कुछ कुछ होता है’ सिनेमे प्रदर्शित करण्यात आले तर, प्रेक्षक ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करतील…’ असं देखील शिव ठाकरे म्हणाला.. एवढंच नाही तर डेझी शाह हिच्याबद्दल देखील शिव ठाकरे याने मोठं वक्तव्य केलं आहे.

शिव ठाकरे म्हणाला, ‘कलर्स टीमने आम्हाला बोलावलं होतं. पण तेव्हा शिझान खान आला नव्हता. त्याठिकाणी आम्ही तिघे होतो. पण तेव्हा फक्त आमचा (शिव आणि डेझी) व्हिडीओ तयार करण्यात आला.. त्यानंतर व्हिडिओ स्लो करुन प्ले केला. व्हिडीओवर एक गाणं- हृदय जोडलं. जर मी प्रेक्षक असतो तर मलाही वाटलं असतं की काहीतरी चालू आहे. पण जे आहे ते ठिक आहे. यात प्रेक्षकांची चूक नाही.. असं देखील शिव ठाकरे म्हणाला.

शिव ठाकरे आणि डेझी शाह यांच्या नात्याची चर्चा ‘खतरो के खिलाडी १३’ शोच्या शुटिंग दरम्यान सुरु झाली. त्यानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं.. पण अद्यापही दोघींनी नात्यावर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.